सिटी बसची दुचाकीला धडक, एक ठार

By Admin | Updated: July 30, 2015 00:10 IST2015-07-30T00:10:50+5:302015-07-30T00:10:50+5:30

सिटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ...

City bus bikes, one killed | सिटी बसची दुचाकीला धडक, एक ठार

सिटी बसची दुचाकीला धडक, एक ठार

हर्षराज कॉलनीनजीकची घटना : पत्नीला आणण्यासाठी जाताना अपघात
अमरावती : सिटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना हर्षराज कॉलनी बसस्टॉपजवळ बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
अतुल अरूणराव काळे (३२. रा. नवनाथ कॉलनी, नवसारी) असे मृताचे नाव आहे. ते नोकरीवरुन परतणाऱ्या पत्नीला घ्यावयास नवसारीवरुन गाडगेनगरला दुचाकी एम.एच.२७-ए.पी.-१९४२ ने निघाले असता विरुध्द दिशेने येणाऱ्या सिटी बस एमएच२७-९३१५ ने हर्षराज कॉलनी बसथांब्याजवळ त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल कले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सिटी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: City bus bikes, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.