लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची टक्कलला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:17+5:30

लॉकडाऊनच्या काळात सलूनची दुकाने पूर्णपणे बंद असल्याने अनेकांनी घरच्या घरी केस कापण्यास व दाढी करण्यास पसंती दिली आहे. अनेक लोक घरीच दाढी करतात. मात्र, केस कापण्यासाठी सलूनच गाठावे लागते. घरच्या घरी केस कटिंग करतेवेळी हेअर स्टाईल कट करता येत नाही. त्यामुळे थेट मशीनने टक्कल करण्याची नवीन क्रेझ सगळीकडे सुरू झाली आहे. ही क्रेझ आबालवृद्धांसह तरुणांमध्ये फेमस झालेली आहे.

Citizens prefer baldness during lockdown | लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची टक्कलला पसंती

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची टक्कलला पसंती

Next
ठळक मुद्देसलून कामगारांची घरपोच सेवा, नागरिक झाले फ्रेश, सॅनिटायझर, मास्कचा वापर

चेतन घोगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : लॉकडाऊनच्या काळात सलून बंद असल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून सलून बंद असल्याने व ३१ मेपर्यंत ते उघडणार नसल्याने घरच्या घरी कटिंग करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यातही कट बिघडून आपला अवतार होऊ नये, यासाठी टक्कल करण्याकडेही अनेकांचा कल आहे. सलून कामगारांनीही ‘होम सर्व्हिस’ देण्यास सुरूवात केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सलूनची दुकाने पूर्णपणे बंद असल्याने अनेकांनी घरच्या घरी केस कापण्यास व दाढी करण्यास पसंती दिली आहे. अनेक लोक घरीच दाढी करतात. मात्र, केस कापण्यासाठी सलूनच गाठावे लागते. घरच्या घरी केस कटिंग करतेवेळी हेअर स्टाईल कट करता येत नाही. त्यामुळे थेट मशीनने टक्कल करण्याची नवीन क्रेझ सगळीकडे सुरू झाली आहे. ही क्रेझ आबालवृद्धांसह तरुणांमध्ये फेमस झालेली आहे. याबाबत सोशल मीडियावर ‘लॉकडाऊन लूक’ लॉकडाऊन कट’ व्हायरल केली जात आहेत.यात घरातील सदस्य एकमेकांना मदत करीत आहेत. घरच्या घरी केस कापले जात असल्याने विशिष्ट हेअर स्टाईल करण्यापेक्षा केस कमी झाले म्हणजे पुरे. असे म्हणत म्हणून अनेक जण सध्या टक्कल करून घेण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत. त्यातच वातावरणातील उष्मा वाढल्याने सर्व ठिकाणी ही पद्धत सध्या फेमस होताना दिसत आहे. टक्कल केल्याने पैशाची बचत होते व अनेक महिन्यापर्यंत कटिंगची झंझट नसल्याने सोशल मीडियावर गमतीदार चर्चा रंगू लागली आहेत.

आमचे हातावर पोट आहे. काम केल्याशिवाय पर्याय उरला नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी दाढी, कटिंग करण्यापूर्वी सर्व साहित्य डेटॉल किंवा सॅनिटायझरमध्ये टाकून निर्जंतुक करतो. तोंडाला रुमाल बांधून ग्राहकांची योग्य ती काळजी घेतो. तसेच दिवसभरात मोजक्याच ग्राहकांना सेवा देतो.
- पुरुषोत्तम मिसळकर,
केस कारागीर

कटिंग करायची जुनी पद्धत
ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी न्हाव्यास घरी बोलावून व एकाच दिवशी कुटुंबातील सर्वांची कटिंग करण्याचा प्रघात होता. चलनापेक्षा धान्याला अधिक महत्त्व होते. गोणपाटावर बसून कटिंग केली जायची. पुन्हा तो ट्रेंड शहरी ग्रामीण भागातही पाहावयास मिळतो आहे. बदलला ती केवळ मोबदल्याची तºहा.

Web Title: Citizens prefer baldness during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.