तहानलेल्या जिवांसाठी नागरिक सरसावले
By Admin | Updated: February 25, 2015 00:30 IST2015-02-25T00:30:36+5:302015-02-25T00:30:36+5:30
'तहानलेल्या जिवांना देऊया पाणी' या मथळ्याखाली 'लोकमत'ने प्रक्राशित केलेल्या वृत्ताची दखल संवेदनशील मनाच्या नागरिकांनी घेतली.

तहानलेल्या जिवांसाठी नागरिक सरसावले
प्रभाव लोकमतचा
अमरावती : 'तहानलेल्या जिवांना देऊया पाणी' या मथळ्याखाली 'लोकमत'ने प्रक्राशित केलेल्या वृत्ताची दखल संवेदनशील मनाच्या नागरिकांनी घेतली. पक्षीमित्रांचे मोबाईल खणखणायला लागले आहे. दोन दिवसांत शेकडो नागरिकांनी पक्षी मित्रांशी सपर्क करुन तहानलेल्या जिवांसाठी आपुलकी दाखविलीे.
उन्हाळ्याच्या दिवसांत माणसांप्रमाणेच पक्षांचाही पाण्यासाठी जीव कासाविस होतोे. माणसांप्रमाणे पक्षांनाही पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'लोकमत'कडून जनजागृती करण्यात येत आहे.
शहरी भागात पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोत कमी आहे, त्यातच शहरात दूषित पाण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे पक्ष्यांचे जीवन माणसांच्या जीवनावर अवलंबून आहे. हिवाळा व पावसाळ्यात पक्ष्यांना पाणी मुबलक प्रमाण मिळू शकते. मात्र उन्हाळयात पक्ष्यांच्या जीवाची लाही लाही होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे नैसर्गिक स्त्रोतातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाण्याअभावी पक्षी मृत्यूमुखी सुध्दा पडतात.