नागरिकांना पडला कोरोनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:15+5:302021-04-06T04:12:15+5:30
पुसला : राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदी लागू करण्यात ...

नागरिकांना पडला कोरोनाचा विसर
पुसला : राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागात नागरिक अद्यापही धडा घ्यायला तयार नाहीत. शहर वजा खेडे व ग्रामीण भागातील स्थिती पाहता, नागरिकांना कोरोनाचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुसला परिसरात नियमाचे उल्लंघन होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा अभाव दिसत आहे. नागरिक मास्कविना बिनधास्त वावरत असून, कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे. वरूड तालुक्यातील पुसला हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. सध्या स्थितीत देशभरात कोरोना थैमान घातले आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्यातून शहरी भागासह खेडुतांनीदेखील धडा घेतलेला नाही.
----------