नागरिकांनी उभे सोयाबीन तुडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:14+5:30

धारणी येथे अमरावती-बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर बुलडाणा अर्बन बँकेचे गोडाऊनमध्ये मेळघाट विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतमोजणी पार पडली. त्या मतमोजणीकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांनी कुसुमकोट बु. गावाजवळून या महामार्गावरील वाहतूक अंतर्गत मार्गाने वळविली होती.

Citizens crushed the standing beans | नागरिकांनी उभे सोयाबीन तुडविले

नागरिकांनी उभे सोयाबीन तुडविले

ठळक मुद्देमतमोजणीदरम्यानचा प्रकार : नुकसानभरपाईची मागणी

पंकज लायदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाट मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान धारणी येथे निकाल ऐकण्याकरिता आलेल्या नागरिकांनी सोयाबीन पीक उभे असलेल्या शेतात ठिय्या मांडला होता. त्यांच्या ये-जा करण्यात अडीच एकरातील सोयाबीन पीक पायदळी तुडविले गेले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी सदर शेतकºयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
धारणी येथे अमरावती-बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर बुलडाणा अर्बन बँकेचे गोडाऊनमध्ये मेळघाट विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतमोजणी पार पडली. त्या मतमोजणीकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांनी कुसुमकोट बु. गावाजवळून या महामार्गावरील वाहतूक अंतर्गत मार्गाने वळविली होती. शहराच्या बाहेरून मतमोजनीस्थळी जाण्याससुद्धा बंदी घातली होती. तरीसुद्धा पोलिसांना न जुमानता नागरिकांनी मतमोजणीस्थळी निकाल ऐकण्याकरिता प्रवेश केला. त्याच ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे मदनलाल लक्ष्मणदास परिहार यांचे २ हेक्टर १९ आर शेत आहे. यात सोयाबीन पेरले होते. हे पीक आता कापणीला आले होते.
निकाल ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रस्ता अवरुद्ध झाल्याने ही गर्दी पोलिसांनी पांगवली. हा जमाव थेट परिहार यांच्या शेतात शिरला. हजारो नागरिक थेट सोयाबीन शेतात गोळा झाल्याने उभे सोयाबीन पीक काही वेळातच लोकांच्या पायाखाली तुडविले गेले. त्यामुळे कठोर परिश्रम घेऊन कसलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मतमोजणीच्या वेळी ही दशा आल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

Web Title: Citizens crushed the standing beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती