वन संवर्धनात नागरिकांचा पुढाकार आवश्यक
By Admin | Updated: January 8, 2017 00:09 IST2017-01-08T00:09:33+5:302017-01-08T00:09:33+5:30
शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले. असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग आहे.

वन संवर्धनात नागरिकांचा पुढाकार आवश्यक
नागरिकांचीही जबाबदारी : वनविभागाचा सक्रिय सहभाग
वैभव बाबरेकर अमरावती
शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले. असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग आहे. परंतु जंगल संरक्षणाची जबाबदारी ही केवळ वनविभागाची नसून त्यात नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे.
वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग, वन्यप्रेमी, नागरिक तसेच निसर्ग संवर्धनाच्या कार्याला दिशा व गती देणाऱ्या राजकीय क्षेत्राचीसुध्दा आहे. जंगलाशेजारी जीवन जगणारे व जंगलावरच त्यांचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या ग्रामस्थांनी जंगल वाचविण्यात सक्रिय सहभाग नोंदविल्यास जिल्ह्यातील जंगल समृध्द होण्यास मोठी मदत मिळू शकेल. त्याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आता अत्यावश्यक झाले असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी दिली. पोहरा, चिरोडी जंगलात आढळून आलेल्या वाघांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
जंगल क्षेत्राला लागूनच गावकऱ्यांचे रहिवासी ठिकाणे आहेत. त्यामुळे जंगलाशेजारील गावांतील नागरिकांच्या संपर्कात वन्यप्राणी येणे साहजिकच आहे. अशावेली वन्यप्राणी व मानवी संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांना मानवी अस्तित्वाची जाणीव व्हावी, या दृष्टीने गावकऱ्यांनी आता पाऊल उचलणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ वनविभागाचीच नसून नागरिकांचे सहकार्य मिळणे गरजेचे झाले आहे.तेव्हाच जंगलाचे संवर्धन होऊ शकेल. (प्रतिनिधी)
चराईमुळे जंगलासह गावकऱ्यांचेही नुकसान
जंगलात जनावरांची केलेल्या चराईमुळे जंगलासह गावकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागता. ही बाब शास्त्रिय दृष्टीही सिध्द झाली आहे. गुरांनी खालेले गवताची वाढ खुंटते व ते नष्ट होते. त्यामुळे त्याठिकाणी रानतुळस किंवा तरोट्यासारख्या वनस्पती उगवितात. या प्रकारामुळे जंगलातील तृणभक्षी हरीण, निलगाय व काळविटसारखे वन्यप्राणी गावकऱ्यांच्या शेतात धाव घेतात. ही बाब नुकसान देय ठरते.
ग्रामस्थ काय करु शकतात
सकाळी व सायंकाळी जंगलात जाणे टाळावे
गुरांना जंगलात सोडण्याऐवजी गवत कापून आणून त्यांना द्यावे. (यामुळे जनावरांचे श्रम कमी होते आणि चांगला चारा मिळाल्यास दुधाचे उत्पादनात वाढ)
गवत कापून आणण्यासाठी स्थानिक जेएफएम समितीची परवानगी घ्यावी. जेणे करून ठराविक भागातील गवत कापल्यास वर्षभर गवत उपलब्ध होईल
इंधनाऐवजी शासकीय योजनेतून मिळणारे एलपीजी गॅस वापरावे, तशी मागणी जेएफएम समितीकडे संस्थांमार्फत करावी.
गावलगत उघड्यावर कचरा फेकू नये, त्यामुळे गावठी डुकर व कुत्र्यांची संख्या वाढून बिबट व अन्य मासंभक्षी प्राणी आकृष्ट होणार नाही.
रात्रीच्या वेळेस जंगलात पायी चालणे टाळावे, लाईट सुरु ठेऊन हार्न वाजवित जाणे
उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या वणव्यांवर लक्ष ठेवणे. वणवा लागल्यास वनविभागाला माहिती कळवून सहकार्य करावे.
जंगल संवर्धनाची जबाबदारी ही वनविभागासह ग्रामस्थ, वन्यप्रेमी संस्था व राजकीय क्षेत्रातील इच्छा शक्तीची आहे. यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा ग्रामस्थाचा आहे. कारण ते जंगलाशेजारी राहतात. त्यामुळे त्यांनी जंगल संवर्धनाविषयी पाऊल उचलणे गरजेचे आहे.
- स्वप्निल सोनोने,
वन्यजीव अभ्यासक