चाकुने भोसकून युवकाची निर्घृण हत्या
By Admin | Updated: August 28, 2016 23:59 IST2016-08-28T23:59:22+5:302016-08-28T23:59:22+5:30
लुटण्याच्या उद्देशाने एका युवकाची चाकुने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली.

चाकुने भोसकून युवकाची निर्घृण हत्या
एनसीसी भवनासमोरील घटना : दोघांना अटक
अमरावती : लुटण्याच्या उद्देशाने एका युवकाची चाकुने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एनसीसी भवनासमोर घडली. महेश सच्चानंद फेरवाणी (२६,रा. सरस्वतीनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले.
मृत महेश फेरवाणी हा सिटी लॅन्ड येथील सिंध गारमेंटमध्ये कार्यरत होता. शनिवारी वसुली करून दुचाकीने घरी जात असताना सरस्वतीनगर मार्गावरील एनसीसी भवनासमोर चार युवकांनी त्याला गाठल आणि पैसे हिसकण्याचा प्रयत्न केला असता महेशने विरोध केला. आरोपींनी चाकुने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि पैसे घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक के.एम.पुंडकर यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे घटनास्थळी पोहचले असता रक्तबंबाळ अवस्थेत महेश आढळून आला. पोलिसांनी तत्काळ महेशला इर्विनला आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा नोंदविलो. तपासकार्य सुरुकेल्यानंतर महेशची हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाली असावी, असा संशय व्यक्त होत आहे
लुटण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली असून याप्रकरणात दोन संशयीताना ताब्यात घेतले आहे. चार जणांनी ही हत्या केल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे.
- अनिल किनगे,
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा