शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त चित्ररथ
By Admin | Updated: December 6, 2015 00:11 IST2015-12-06T00:11:44+5:302015-12-06T00:11:44+5:30
अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयावर आधारित चित्ररथाचे आयोजन करण्यात आले ...

शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त चित्ररथ
पथनाट्याद्वारे योजनांची माहिती : पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी
अमरावती : अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयावर आधारित चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री पोटे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी किरण गित्ते, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक रवींद्र धुरजड, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चित्ररथावर जलयुक्त शिवार, धडक सिंचन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कर्जमुक्ती धोरण, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, उद्योग, रेशीम विकास, नैसर्गिक आपत्तीत शासनाची मदत, पीक विमा, महाराजस्व अभियान, सेवा हमी कायदा, जिल्हा नियोजन समिती, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत झालेल्या कामाची सचित्र माहिती प्रदर्शित करण्यात असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी श्रीफळ फोडून हिरवी झेंडी दाखविली. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी ना. पोटे व जिल्हाधिकारी गित्ते व उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले. वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या चित्ररथासोबतच कलापथकाचेही आयोजन करण्यात आले. तरुण कलाकारांनी सादर केलेल्या कलापथकाबद्दल ना.पोटे यांनी दीपक नांदगावकर व सर्व कलाकरांचे कौतुक केले. माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे, नितीन खंडारकर, विजय राऊत, रमेश बारस्कर, योगेश गावंडे, दिनेश धकाते, सागर राणे, सुरेश राणे, गणेश वानखडे, हर्षराज हाडे, दीपाली ढोमणे, देविदास जोशी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)