शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

चिंचोलीत ग्रामसभेआधी ग्रामसेवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:00 AM

शिवीगाळ करुन गुणवंत मानकर यांनी आपल्याला मारहाण केली तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कार्यालयातील खुर्ची तोडली, अशी तक्रार उईके यांनी सकाळी ११.४५ च्या सुमारास पोलीस ठाण्यात नोंदविली.

ठळक मुद्देग्रामस्थाला अटक : प्रजासत्ताक दिनाची घटना, अमरावती कारागृहात रवानगी

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास विशेष ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच ग्रामसचिव व ग्रामस्थ यांच्यात हाणामारी झाली. ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.पोलीस सूत्रांनुसार, ग्रामपंचायत आवारात झेंडावंदन झाल्यानंतर ग्रामसेवक रमेश उईके (५०), कर्मचारी नंदकिशोर वसू, कमलेश खंडारे, प्रमोद आंबडकर हे कार्यालयात कामकाज करीत असताना गुणवंत तुळशीराम मानकर (४५) हे आले. घरकुल व स्वच्छतागृहाच्या अर्जाबाबत त्यांनी ग्रामसेवकाला विचारणा केली. त्यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.शिवीगाळ करुन गुणवंत मानकर यांनी आपल्याला मारहाण केली तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कार्यालयातील खुर्ची तोडली, अशी तक्रार उईके यांनी सकाळी ११.४५ च्या सुमारास पोलीस ठाण्यात नोंदविली.प्रत्यक्षदर्शीनुसार, महामानवांच्या प्रतिमांचे नुकसान झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. या घटनेने काही वेळाकरिता गावात तणावाचे वातावरण होते. रहिमापूर पोलिसांनी गुणवंतविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ४२७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला सोमवारी अंजनगाव सुर्जी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील दिनेश वाकोडे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने गुणवंतची रवानगी अमरावती येथील कारागृहात केली.घटनेमागील वास्तव वेगळेचगुणवंत मानकर हे पाच महिन्यांपासून ग्रामसेवक रमेश उईके यांच्याकडे स्वत:च्या जागेवर घरकुल आणि स्वच्छतागृहासाठी दिलेल्या अर्जाची सद्यस्थिती काय, याची माहिती मागत होते. पण, अंतर्गत राजकारणामुळे प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे मानकर यांनी ते पाऊल उचलल्याची चर्चा गावात रंगली आहे.ग्रामसेवक रमेश उईके यांच्या तकारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच त्याला तात्काळ अटक करण्यात आली.- जमील शेख, ठाणेदार, रहिमापूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी