जुळ्या शहरात चायना मांजामुळे पक्षिजीवन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST2020-12-26T04:10:51+5:302020-12-26T04:10:51+5:30
फोटो पी २५ परतवाडा मांजा परतवाडा : चायना मांजावर बंदी असली तरी जुळ्या शहरात मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत ...

जुळ्या शहरात चायना मांजामुळे पक्षिजीवन धोक्यात
फोटो पी २५ परतवाडा मांजा
परतवाडा : चायना मांजावर बंदी असली तरी जुळ्या शहरात मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत आहे. त्यातून अपघात घडत असून शहरातील एका इमारतीवर मांजात अडकलेल्या कबुतराला पक्षिमित्रांनी जीवदान दिले.
पतंग उडविण्यासाठी चायना मांजा वापरण्यावर पूर्णत: बंदी आहे. अचलपूर शहरात रस्त्यांवर चायना मांजामुळे काहींच्या गळ्याला इजा पोहोचल्याच्या घटना ताज्या आहेत. शहरातील सदर बाजार परिसरात एका इमारतीवर कबुतराच्या गळ्याला चायना मांजा अडकल्याने तो जिवाच्या आकांताने तडफडत होता. परिसरातील पक्षी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे व पियान्शू शर्मा यांना सदर प्रकार दिसताच त्यांनी इमारतीवर चढून मांज्यात अडकलेल्या कबुतराला मुक्त केले. काही तासांपासून पायात व गळ्यात चायना मांजात अडकून पडलेल्या कबुतराला या पक्षीमित्रांनी पाणी पाजले. क्षणातच घाबरलेल्या कबुतराने आकाशात झेप घेत हवेत मोकळा श्वास घेतला.