शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ खोडकर मुले पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: August 6, 2016 23:56 IST

नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ काही शाळकरी मुलांनी रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवल्याची बाब शनिवार ६ रोजी समोर आली.

बडनेरा : नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ काही शाळकरी मुलांनी रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवल्याची बाब शनिवार ६ रोजी समोर आली. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. या सर्व खोडकर मुलांना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले होते. समज देऊन सोडण्यात आले. शनिवार ६ रोजी साईनगर परिसरातील काही अल्पवयीन मुलं शाळा महाविद्यालयाला गुत्ती मारुन नया अकोला रेल्वे स्टेशनकडे गेले. या मुलांपैकी एकाचा वाढदिवस होता. रेल्वे स्टेशन परिसरात एका डबक्यात साचलेल्या पाण्च्याच्या ठिकाणी या सर्वांनी सेल्फी काढला.त्यानंतर या मुलांनी नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर दोन्ही बाजूने दूरवर पर्यंत गोटे ठेवले होते. त्याच दरम्यान विद्युत प्रवाह तपासणारी टॉवर व्हॅन या ट्रॅकवरुन जात होती. या व्हॅनचे चालक एम.एम. ढोक व अभियंता किशोर बोटवरे यांना ही बाब लक्षात आली. क्षणात चालकाने व्हॅन थांबविली. थोड्याच वेळाने एक प्रवासी वाहनदेखील तेथून जाणार होते. परिसरातील लोकांनी या खोडकर मुलांना रेल्वे सुरक्षा बलच्या ताब्यात दिले. तेथे सर्व मुलांच्या पालकांना बोलविण्यात आले होते. मुलांना तथा पालकांना समज देण्यात आला. पुन्हा असा प्रकार घडता कामा नये असा दम देण्यात आला. टॉवर व्हॅन आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्याच दरम्यान प्रवाशी गाडी आली असती तर अल्पवयीन मुलांच्या खोडसाळपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. (शहर प्रतिनिधी)