‘ती’ खोडकर मुले पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: August 6, 2016 23:56 IST2016-08-06T23:56:39+5:302016-08-06T23:56:39+5:30
नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ काही शाळकरी मुलांनी रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवल्याची बाब शनिवार ६ रोजी समोर आली.

‘ती’ खोडकर मुले पोलिसांच्या ताब्यात
बडनेरा : नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ काही शाळकरी मुलांनी रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवल्याची बाब शनिवार ६ रोजी समोर आली. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. या सर्व खोडकर मुलांना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले होते. समज देऊन सोडण्यात आले.
शनिवार ६ रोजी साईनगर परिसरातील काही अल्पवयीन मुलं शाळा महाविद्यालयाला गुत्ती मारुन नया अकोला रेल्वे स्टेशनकडे गेले. या मुलांपैकी एकाचा वाढदिवस होता. रेल्वे स्टेशन परिसरात एका डबक्यात साचलेल्या पाण्च्याच्या ठिकाणी या सर्वांनी सेल्फी काढला.त्यानंतर या मुलांनी नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर दोन्ही बाजूने दूरवर पर्यंत गोटे ठेवले होते. त्याच दरम्यान विद्युत प्रवाह तपासणारी टॉवर व्हॅन या ट्रॅकवरुन जात होती. या व्हॅनचे चालक एम.एम. ढोक व अभियंता किशोर बोटवरे यांना ही बाब लक्षात आली. क्षणात चालकाने व्हॅन थांबविली. थोड्याच वेळाने एक प्रवासी वाहनदेखील तेथून जाणार होते. परिसरातील लोकांनी या खोडकर मुलांना रेल्वे सुरक्षा बलच्या ताब्यात दिले. तेथे सर्व मुलांच्या पालकांना बोलविण्यात आले होते. मुलांना तथा पालकांना समज देण्यात आला. पुन्हा असा प्रकार घडता कामा नये असा दम देण्यात आला. टॉवर व्हॅन आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्याच दरम्यान प्रवाशी गाडी आली असती तर अल्पवयीन मुलांच्या खोडसाळपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. (शहर प्रतिनिधी)