लघुसिंचन प्रकल्पात बालक बुडाला
By Admin | Updated: March 20, 2015 00:10 IST2015-03-20T00:10:07+5:302015-03-20T00:10:07+5:30
तालुक्यातील झटामझिरी येथील लघुसिंचन प्रकल्पात पोहण्यास गेलेल्या १० वर्षीय बालकाचा गाळात फसल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या दरम्यान घडली.

लघुसिंचन प्रकल्पात बालक बुडाला
वरुड : तालुक्यातील झटामझिरी येथील लघुसिंचन प्रकल्पात पोहण्यास गेलेल्या १० वर्षीय बालकाचा गाळात फसल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. या मुलाचा मृतदेह गुरूवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
मृत बालकाचे नाव हिमांशू अरुण उघडे (१० रा. झटामझिरी) असे आहे. तो जि.प. शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. बुधवारी सायंकाळी मित्रांसह तो झटामझिरी प्रकल्पावर गेला होता. पाण्यात उतरताच तो गाळात फसला. मित्रांनी गावकऱ्यांना माहिती दिली. मात्र त्याचा शोध लागला नाही. गुरूवारी सकाळी हिमांशूचा मृतदेह तरंगताना आढळला. वरुडचे एएसआय विजय लेवलकर यांनी मृतदेह बाहेर काढून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.