आईला मारहाण करणाऱ्या मुलाला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:00 AM2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:31+5:30

अचलपूर तहसील कार्यालय येथे २५ सप्टेंबर २०१८ रोजी संजय इंगोले यांच्या प्रकरणात साक्ष देण्यास जायचे होते. परंतु, त्याचवेळी मुलगा आरोपी दीपक महादेव राव (४५) हा घरी आला. त्याने पुरावा देण्यास मज्जाव केला तसेच नाका-तोंडावर, हातावर मारहाण केली. यावेळी जखमी झालेल्या महिलेला दुसरा मुलगा प्रकाश, त्याची पत्नी व संजय इंगोले यांनी सोडविले व तिला उपचाराठी दाखल केले.

The child who beat the mother was sentenced to life imprisonment | आईला मारहाण करणाऱ्या मुलाला सश्रम कारावास

आईला मारहाण करणाऱ्या मुलाला सश्रम कारावास

googlenewsNext
ठळक मुद्दे५०० रुपये दंड : अचलपूर न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : तहसीलमधील एका प्रकरणात पुरावा देण्यास जाणाºया आईला मारहाण करणाºया मुलास अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने शुक्रवारी एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली.
शहरातील मिल कॉलनी येथील रहिवासी ताई महादेव राव (६०) असे कर्करुग्ण फिर्यादी महिलेचे नाव आहे. अचलपूर तहसील कार्यालय येथे २५ सप्टेंबर २०१८ रोजी संजय इंगोले यांच्या प्रकरणात साक्ष देण्यास जायचे होते. परंतु, त्याचवेळी मुलगा आरोपी दीपक महादेव राव (४५) हा घरी आला. त्याने पुरावा देण्यास मज्जाव केला तसेच नाका-तोंडावर, हातावर मारहाण केली. यावेळी जखमी झालेल्या महिलेला दुसरा मुलगा प्रकाश, त्याची पत्नी व संजय इंगोले यांनी सोडविले व तिला उपचाराठी दाखल केले.
अचलपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला होता. प्राथमिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक हरीश कथलकर व नंतरचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप वानखेडे यांनी केला. यानंतर दोषारोपपत्र अचलपूर येथील न्यायालयात दाखल करण्यात आले.
सरकार पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता पंकज माहुरे यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. न्यायालयात दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी आरोपी दीपक रावला कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवित कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: The child who beat the mother was sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.