चिखलदरा, काटकुंभ, चुर्णी हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:26+5:302021-04-06T04:12:26+5:30

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह काटकुंभ, चुरणी हॉटस्पॉट केंद्र ठरले असून तालुक्यात एकूण २२ ...

Chikhaldara, Katkumbh, Churni hotspots | चिखलदरा, काटकुंभ, चुर्णी हॉटस्पॉट

चिखलदरा, काटकुंभ, चुर्णी हॉटस्पॉट

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह काटकुंभ, चुरणी हॉटस्पॉट केंद्र ठरले असून तालुक्यात एकूण २२ गावांमध्ये सोमवारी एकूण तब्बल ७३ पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला असून अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे मेळघाटात आदिवासीसह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

चिखलदरा पर्यटन स्थळासह तालुक्यातील आदिवासी बहुल भागात कोरोनाने फारसा शिरकाव केला नव्हता. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बिनधास्त दिसत होते. वर्षभरात एकूण २४६ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असले तरी एकही मृत्यूची नोंद आरोग्य विभागात जवळ नाही. तर मागील चार दिवसात अचानक पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना त्रिसूत्री व कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. चिखलदरा शहरातून उपचारार्थ बाहेर जिल्ह्यात गेलेल्या काही स्थानिक नागरिकांचा कोरोणामुळे मृत्यू झाल्याची नोंद असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी दिली.

बॉक्स

पर्यटन नगरी तीन हॉटस्पॉट

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालात २० केस असून काटकुंभ १०, चुरणी ८, चिखली काजलडोह, बामादेही, मेहरीआम, चिखली, कण्हेरी, गंगारखेडा, हतरू येथे प्रत्येकी तीन ते चार रुग्ण असून डोमा, सेमाडोह, कुलंगला, कामापूर, बारूगव्हाण, भंडोरा, रेहट्याखेडा रायपूर या २२ गावात प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आहे.

बॉक्स

स्थलांतरातून वाढल्याची शक्यता

मेळघाटातील आदिवासी मोठ्या प्रमाणात कामासाठी शहरी भागात स्थलांतरित झाले होते. होळी त्यांचा सर्वात मोठा सण असल्याने गत आठवड्यात हे आदिवासी शेकडोंच्या संख्येने गावी परतले आहेत. त्यातूनच आता त्यांनी सोबत कोरोना आणला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

कोट

चिखलदरा, काटूकुंभ, चुरणी हे तीन हॉटस्पॉट आहेत. प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.

माया माने

तहसीलदार चिखलदरा

कोट

तालुक्‍यात एकूण ७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये चिखलदरा स्थानिक २० रुग्ण असून इतर २२ गावांमध्ये ५३ पॉझिटिव्ह आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने योग्य ते कार्य सुरू आहे.

सतीश प्रधान

तालुका वैद्यकीय अधिकारी चिखलदरा

Web Title: Chikhaldara, Katkumbh, Churni hotspots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.