चिखलदरा फेस्टीवल राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार

By Admin | Updated: November 17, 2014 22:44 IST2014-11-17T22:44:17+5:302014-11-17T22:44:17+5:30

जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची माहिती जिल्ह्यापुरतीच मर्यादित न ठेवता ती भव्य स्वरुपात अमरावती व्यतिरिक्त राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचावी, यासाठी जिल्हा प्रशासन व पर्यटन विकास

The Chikhaldara Festival will reach the junction of the state | चिखलदरा फेस्टीवल राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार

चिखलदरा फेस्टीवल राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार

अमरावती : जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची माहिती जिल्ह्यापुरतीच मर्यादित न ठेवता ती भव्य स्वरुपात अमरावती व्यतिरिक्त राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचावी, यासाठी जिल्हा प्रशासन व पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून चिखलदरा फेस्टीवल पोहचविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी किरण गित्ते व पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत सोमवारी घेण्यात आला. मेळघाट कुपोषणामुळे सर्वत्र ओळखले जाते. मात्र चिखलदऱ्याची ओळख यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पाहिजे तशी पोहचली नाही. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून या ठिकाणी अमरावती व विभागातील पर्यटनासोबतच राज्याच्या इतरही भागातूनही मोठ्या संख्येने पर्यटकांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाची अनेक वैशिष्ट्य आहेत. मात्र या वैशिष्ट्यांची ओळख अद्यापपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात पाहिजे त्याप्रमाणात पोहचली नाही. परिणामी या महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळाकडे पर्यटकांचा ओघ कमी आहे. त्यामुळे चिखलदरासारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाला राज्यातच नव्हे तर त्यापलीकडे येता यावे, यादृष्टीने चिखलदरा येथे घेण्यात येणारा चिखलदरा फेस्टीवल महोत्सव यापुढे वर्षात एकदा नव्हे तर तो दोनदा घेण्यात यावा. डिसेंबर ते जानेवारी याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत हा फेस्टीवल घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Web Title: The Chikhaldara Festival will reach the junction of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.