चिखलदरा @ ४०
By Admin | Updated: May 20, 2016 00:07 IST2016-05-20T00:07:29+5:302016-05-20T00:07:29+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे तापमान इतिहासात प्रथमच ४० डिग्री सेल्सिअसवर

चिखलदरा @ ४०
नंदनवन ‘हॉट’ : ऐतिहासिक तापमानाची नोंद
नरेंद्र जावरे चिखलदरा
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे तापमान इतिहासात प्रथमच ४० डिग्री सेल्सिअसवर नोंद १८ मे रोजी करण्यात आली. विदर्भातील या सुविख्यात हिल स्टेशनमध्ये पहिल्यांदाच एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर ही नोंद करण्यात आली.
सातपुडा पर्वतरांगांवर वसलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर ८ डीग्रीच्यावर आजपर्यंत तापमान कधीच गेले नाही. मात्र, मागील आठवड्यापासून राज्यभरात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमध्ये चिखलदऱ्याची देखील होरपळ होत आहे. समुद्र सपाटीपासून ३६०० फुट उंचीवरील ठिकाण पहिल्यांदाच एवढे तापले आहे.
जिल्ह्यातील इतर भागापेक्षा येथील सरासरी तापमान नेहमीच फार कमी असते. पण, यंदा १८ मे रोजी येथे ऐतिहासिक तापमानाची नोंद झाली. यावरून यंदाच्या उन्हाळ्याच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकते. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळेच चिखलदऱ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी तापमानाने असा कहर केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.