धामणगावात मुख्याधिकारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST2021-04-08T04:14:38+5:302021-04-08T04:14:38+5:30
दोनशे जणांना दंड एका जणाविरुद्ध फौजदारी गुन्हा धामणगाव रेल्वे : नागरिकांना वारंवार सूचना देऊनही पालन न करणाऱ्या दोनशे जणांना ...

धामणगावात मुख्याधिकारी रस्त्यावर
दोनशे जणांना दंड
एका जणाविरुद्ध फौजदारी गुन्हा
धामणगाव रेल्वे : नागरिकांना वारंवार सूचना देऊनही पालन न करणाऱ्या दोनशे जणांना व एका जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा आज स्वतः मुख्याधिकारी यांनी दाखल केला आहे.
राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे मिनी लॉक डाऊन घोषित झाले असताना धामणगाव शहरात या आदेशाची
नागरिकांनी पालन केले नाही त्यामुळे धामणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे हे स्वतः रस्त्यावर उचरित कारवाईला सुरुवात केली शहरातील दोनशे जणांना आज दंड देण्यात आला तर एका जनावर फौजदारी कारवाई करण्यात आली या सदर कारवाई वेळी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,न प अग्निशमन अधिकारी हितेश गावंडे,प्रशासन अधिकारी श्री गुजर,किशोर बागवान अविनाश डगवार , यादव, पांडे इंदूरकर हे कर्मचारी उपस्थित होते.