ओपन स्पेसची विक्री केल्याप्रकरणी मुख्यधिकाऱ्यांची विक्रमसिंह परिहार यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:32+5:302021-02-05T05:26:32+5:30

अमरावती : लेआऊटमधील खुल्या जागेची (ओपन स्पेसची) विक्री केल्याबाबत दर्यापूर जिनिंग ॲन्ड प्रेसिंगचे अध्यक्ष विक्रमसिंह परिहार यांना दर्यापूर नगरपालिकेच्या ...

Chief Minister's notice to Vikram Singh Parihar regarding sale of open space | ओपन स्पेसची विक्री केल्याप्रकरणी मुख्यधिकाऱ्यांची विक्रमसिंह परिहार यांना नोटीस

ओपन स्पेसची विक्री केल्याप्रकरणी मुख्यधिकाऱ्यांची विक्रमसिंह परिहार यांना नोटीस

अमरावती : लेआऊटमधील खुल्या जागेची (ओपन स्पेसची) विक्री केल्याबाबत दर्यापूर जिनिंग ॲन्ड प्रेसिंगचे अध्यक्ष विक्रमसिंह परिहार यांना दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्यधिकारी गीता वंजारी यांनी २१ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. ती नोटीस परिहार यांनी घेतली नसून, २ फेब्रुवारी रोजी सदर नोटीस त्यांच्या घरावर नगरपालिकेच्यावतीने चिकटविली.

नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत व्यक्तिश: आवश्यक कागदपत्रांसह मुख्याधिकारी यांच्या समक्ष उपस्थित राहून विहीत मुदतीत खुलासा सादर करण्याचा उल्लेख सदर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास याबाबत आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची बाब नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.

शेतकरी जिनिंग ॲन्ड प्रेसिंग मौजा दर्यापूर येथील शीट नंबर ४२, प्लॉट नंबर १४९२ सर्व्हे नंबर ६/३ लेआऊटसाठी जिनिंग प्रेसिंगचे तत्कालीन अध्यक्षांनी लेआऊटसाठीची अकृषक मान्यता घेतली होती. ही घेताना आदेशाच्या अटी, शर्तींनुसार सार्वजनिक उपयोगाकरिता प्रस्तावित केलेल्या खुल्या जागेचा व रस्त्याचा उपयोग सार्वजनिक कामाकरिता करण्यात येईल व सदर जमिनी स्थानिक प्राधिकरणाकडे विनामूल्य हस्तांतरीत करण्यात यावे, असे नमूद केलेले होते. मात्र, असे असतानाही लेआऊटमधील खुल्या जागा व रस्ते प्राधिकरणास हस्तांतरीत न करता ५ मे २०१० रोजी दोन जणांना सदर लेआऊटमधील खुल्या जागेची आठ हजार स्क्वेअर फूट (ओपन स्पेसची) विक्री केल्याचे आढळून आले. या प्रकरणी जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष विक्रमसिंह परिहार यांना लेखी खुलासा आवश्यक कागदपत्रांसह तीन दिवसांच्या आत मुख्याधिकाऱ्यांकडे उपस्थित राहून सादर करावा लागेल. विक्रमसिंह परिहार हे दर्यापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष असून, विद्यमान स्वीकृत सदस्य आहेत.

कोट

आम्हाला खरेदीखत प्राप्त झाले. त्यानुसार सदर जागा ओपन स्पेस असल्याचे दिसून येते. तत्कालीन जिनिंग प्रेसिंगच्या अध्यक्षांनी ती जागा नगरपरिषदेला हस्तांतरित करायला हवी होती. मात्र, तसे न करता ती जागा विक्री केल्याचे प्राथमिक तपासणीत पुढे आले आहे. त्यांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मागविले आहे.

गीता वंजारी, मुख्याधिकारी, दर्यापूर नगरपरिषद

कोट

परिहार यांचा कोट आहे.

Web Title: Chief Minister's notice to Vikram Singh Parihar regarding sale of open space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.