मुख्यमंत्री येणार मामांच्या गावी

By Admin | Updated: November 18, 2014 22:47 IST2014-11-18T22:47:07+5:302014-11-18T22:47:07+5:30

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत पहिल्यांदाच येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून आढावा बैठक, अधिकाऱ्यांची हितगुज, भाजप पदाधिकारी,

The Chief Minister will visit the villages of Mai | मुख्यमंत्री येणार मामांच्या गावी

मुख्यमंत्री येणार मामांच्या गावी

बालाजी प्लॉट परिसरात लगबग : रस्ते दुरुस्ती, साफसफाईची कामे वेगात
अमरावती : मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत पहिल्यांदाच येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून आढावा बैठक, अधिकाऱ्यांची हितगुज, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असा त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांचे मामा असलेल्या कलोती परीवाराकडेही जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक बालाजी प्लॉट परिसरात रस्त्याची दुरुस्ती, साफसफाई आदी कामे वेगाने केली जात आहेत. या भागात दोन दिवसांपासून महापालिका प्रशासन तळ ठोकून असल्याने खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मामाच्या गावाला येत असल्याची प्रचिती अनुभवयास मिळत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे बालपण अमरावतीत गेले. त्यांचे या शहराशी भावनिक नाते जुळलेले आहेत. अंबानगरी हे त्यांचे आजोळ आहे. अंबानगरीत आले आणि मामाच्या घरी भेटीला गेले नाही, असे न करता ते आपल्या मामाच्या घरी भेट देणार आहेत.
आढावा बैठकीसाठी अमरावतीचा दौरा निश्चित करताना त्यांनी स्थानिक बालाजी प्लॉट परिसरातील रहिवासी असलेले त्यांचे मामा कलोती यांच्याकडे भेटीसाठी जाण्याचे ठरविले आहे.
रमेश कलोती, चंद्रकांत कलोती, रोहीत कलोती यांच्या ‘प्रभा निवास’ येथे मुख्यमंत्री संपूर्ण कलोती कुटुंबातील सदस्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी बालाजी प्लॉट परिसरात लगबग सुरु झाली आहे. याच श्रुंखलेत मंगळवारी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, आयुक्त अरुण डोंगरे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, अजय सामदेकर, वैद्यकीय आरोग्य देवेंद्र गुल्हाने, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, अभियंता काझी, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे आदींनी बालाजी प्लॉट परिसरातील पाहणी दौरा केला.
या भागातील रस्ते दुरुस्ती कामे, नाल्यांची साफसफाई, प्रकाश व्यवस्था, वृक्ष कटाई, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, वराह पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.
यावेळी कलोती यांच्या घरासमोरील रस्ता, शिंगणे ते देशमुख यांच्या घरापर्यंतचा रस्ता दुरुस्तीचे कामे तातडीच्या निधीतून करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी प्रशासनाला दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister will visit the villages of Mai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.