मुख्यमंत्री घेणार जिल्ह्याचा आढावा

By Admin | Updated: December 11, 2015 00:38 IST2015-12-11T00:38:39+5:302015-12-11T00:38:39+5:30

हिवाळी अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाची बैठकीचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे.

Chief Minister will take a review of the district | मुख्यमंत्री घेणार जिल्ह्याचा आढावा

मुख्यमंत्री घेणार जिल्ह्याचा आढावा

नागपुरात बैठक : अधिकाऱ्यांचा ताफा रवाना
अमरावती : हिवाळी अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाची बैठकीचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील समस्यांचा आढावा विधान भवनात दुपारी ४ वाजता घेणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा ताफा उपराजधानीकडे रवाना झाला आहे.
जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारची कामे, शेतकरी आत्महत्याची स्थिती, विद्युत जोडणी, भ्रष्टाचाराची प्रकरणे, कायदा व सुव्यवस्था स्थिती, रिक्त पदांचा अनुशेष व अन्य महत्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, पालक सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त,महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ व अन्य महत्वाचे अधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत. आढावा बैठकीसाठी आवश्यक माहितीची प्रक्रिया गुरूवारी महसूल, कृषी, स्ािंचन, बांधकाम, जिल्हा परिषद व अन्य विभागात बैठकीची एकच लगबग सुरू होती.
या मागण्या ऐकणार
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी भूसंपादनकरिता निधीची मागणी, कृषीपंपांना वीज जोडणी तसेच ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांची स्थापना करणे, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ग्रामीण भागात रुग्णालये उभारण्यासंबंधीचे प्रस्ताव, मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडले जाणार आहे. याशिवाय मेळघाटातील कुपोषण व अन्य आरोग्य सेवा सुनियोजित बनविण्याकरिता नवीन तंत्रज्ञान असलेली अ‍ॅम्बुलन्स यासारख्या मागण्यांमधून शेतकरी व मेळघाट विकास हा उद्देश जिल्हा प्रशासनाचा आहे.

Web Title: Chief Minister will take a review of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.