श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार
By Admin | Updated: July 18, 2015 00:21 IST2015-07-18T00:21:03+5:302015-07-18T00:21:03+5:30
अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्या राजापेठ पोलीस ठाण्याजवळच्या महानगरपालिका संकुलात उभारलेल्या नवनिर्मित पत्रकार भवनाचा उद्घाटन सोहळा ...

श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार
अमरावती : अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्या राजापेठ पोलीस ठाण्याजवळच्या महानगरपालिका संकुलात उभारलेल्या नवनिर्मित पत्रकार भवनाचा उद्घाटन सोहळा रविवार १९ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.
उद्घाटनानंतर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृह अमरावती येथे करण्यात आले आहे. अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने राजापेठ पोलीस ठाण्याजवळच्या मनपा संकुलात पत्रकार भवन बांधण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार आनंदराव अडसूळ राहतील. प्रमुख अतिथींमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रवीण पोटे, नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील, महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, आमदार सुनिल देशमुख, आमदार रवी राणा, माजी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार उपस्थित राहतील.
याच सोहळ्यात पत्रमहर्षी स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. बाळासाहेब मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी पत्रकारिता विषयावर काढण्यात आलेल्या बिंब प्रतिबिंब या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल. (प्रतिनिधी)