मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात

By Admin | Updated: February 5, 2016 00:15 IST2016-02-05T00:15:53+5:302016-02-05T00:15:53+5:30

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Chief Minister Devendra Fadnavis today in the district | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात

अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ९.२० वाजता राजभवन येथून हेलिकॉप्टरने चिखलदऱ्याकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी ११.३५ वाजता त्यांचे चिखलदरा येथे आगमन होईल. तेथून मोटारीने निवासी अंध विद्यालयाकडे ते प्रयाण करतील.
सकाळी ११.४० वाजता निवासी अंध विद्यालय येथे मुख्यमंत्री राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) द्वारा संचालित निवासी अंध विद्यालयाच्या रजत जयंती महोत्सवास उपस्थित राहतील. दुपारी १२.३५ वाजता पोलीस कवायत मैदानाकडे चिखलदरा पर्यटन महोत्सवास ते उपस्थित राहतील व दुपारी २.१५ वाजता ते हेलिकॉप्टरने चांदूर बाजारकडे प्रयाण करतील. तेथील भक्तीधाम हेलिपॅड वर आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते भक्तीधाम येथील संत गुलाबराव महाराज परिसरातील कामांचे भुमिपूजन होईल. दुपारी ३ वाजता टोंगलापूर-मासोद कडे प्रयाण करतील. दुपारी ३.१५ वाजता त्यांचे टोंगलापूर-मासोद येथे आगमन होईल.त्यानंतर अपंग पुनर्वसन केंद्र इमारतीचे उद्घाटन व अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहतील. येथून ते दुपारी ४.५० वाजता बेलोरा विमानतळावरुन विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis today in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.