धामोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST2021-04-02T04:13:17+5:302021-04-02T04:13:17+5:30
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील धामोरी कसबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना शाखा व शिव-शक्ती युवा प्रतिष्ठानच्यावतीने ...

धामोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील धामोरी कसबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना शाखा व शिव-शक्ती युवा प्रतिष्ठानच्यावतीने पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन धामोरी येथील पोलीस पाटील पूनम कंटाळे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अमोल वारघडे, माजी सरपंच अविनाश पाटील, शेखर अवघड, शाखाप्रमुख नारायण सखे, रामराव ढोलवाडे, नरेश ढवळे, बोराळे गुरुजी, सुनील ढोके, बंडू लोथे, काशीनाथ सखे ,कैलास भोगे ,दिलीप काळबांडे, मधुकरराव सखे, विष्णुपंत बैलमारे, गजू पाटील, अरुण पाटील, प्रभाकरराव खरबडे, पंकज ढोलवाडे, राजकुमार ढोलवाडे, दीपक लकडे, संजय साबळे, पवन भिडेकर, प्रल्हाद गाळे, चेतन खर्चान, प्रल्हाद चावरे, सतीश भांडे, हरी ढोलवाडे यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.