ध्वनिचित्रफितीतील आवाज तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:53+5:30
लालखडी स्थित मदरशाशी संबंधित कर्मचारी व मुली अशा २० जणांचे बयाण पोलिसांनी आतापर्यंत नोंदविले. जियाउल्लाची सहकारी फिरदौसला नागपुरी गेट पोलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय (८) येथे न्या. एस.ए. सिन्हा यांच्यापुढे हजर केले.

ध्वनिचित्रफितीतील आवाज तपासणार
अमरावती : मदरशातील मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी फिरदौस हिच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. मुख्य आरोपी मदरशाचा अध्यक्ष जियाउल्ला खान याच्या समर्थनार्थ व्हायरल केलेल्या व्हिडीओतील व्हॉइस फिरदौसच्या आवाजाशी जुळतो का, ही बाब पोलीस पडताळून पाहणार आहेत. लैंगिक अत्याचाराच्या आरोपांविषयी जियाउल्लाचे मौन कायम आहे. त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
लालखडी स्थित मदरशाशी संबंधित कर्मचारी व मुली अशा २० जणांचे बयाण पोलिसांनी आतापर्यंत नोंदविले. जियाउल्लाची सहकारी फिरदौसला नागपुरी गेट पोलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय (८) येथे न्या. एस.ए. सिन्हा यांच्यापुढे हजर केले. मदरशातील आणखी मुलींवर लैंगिक अत्याचार झाले का, मुलींचा गैरवापर होत आहे का, याबाबत चौकशी आणि जियाउल्ला खानच्या समर्थनार्थ व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रकरणी फिरदौसच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याची पडताळणी करण्याच्या मुद्यावर पोलिसांनी न्यायालयात फिरदौसच्या कोठडीची मागणी केली. सरकारी पक्षाकडून वकील मंगेश भागवत व बचाव पक्षाकडून बबलू रंगारी, राजेश बत्रा यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत तपास करीत आहेत.