नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: October 14, 2015 00:25 IST2015-10-14T00:25:22+5:302015-10-14T00:25:22+5:30
टेंभूरखेडा येथील एका सुशिक्षित बेरोजगाराला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष आणि नियुक्ती पत्र देऊन ...

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
वरुड पोलिसात तक्रार : राज्यात टोळी सक्रिय असल्याची चर्चा
वरुड : टेंभूरखेडा येथील एका सुशिक्षित बेरोजगाराला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष आणि नियुक्ती पत्र देऊन लाखो रुपयांनी एका युवकासह पत्रकाराला गंडविल्याची घटना नुकतीच घडली. बेरोजगारांना नोकरीचे प्रलोभने देऊन गंडविणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याची चर्चा आहे.
फसवणूक झालेल्या युवकाचे नांव सुमेध नरेंद्र सोनुले २९ असे आहे. सदर युवकाने वृत्तपत्राताील जाहिरात पाहून संबंधित कंपनीकडे नोकरीकरीता अर्ज केला होता. यानुसार कंपनीने मोबाईलवर मुलाखत घेण्यात येवून थेट नियुक्ती पत्र ई मेलवर पाठविण्यात आले. याकरिता तालुका समन्वयक म्हणून तक्रारकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानुसार तालुका समन्वयकाला ग्रामसमन्वयकाची निवड करायची होती. याकरिता तालुका समन्वयकाला २० हजार आणि ग्रामसमन्वयकासाठी ६ हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागत होती. यानुसार तक्रारकर्ते सुमेध नरेंद्र सोनुले यांनी वरूड तालुका समन्वयक तर शेंदूरजनाघाट येथील अतुल काळे हे मोर्शी तालुका समन्वयक पदावर निुयक्त झाले होते. तालुका समन्वयकाकडून ग्राम समन्वयकांची नियुक्ती करुन घेण्यात आली. यामध्ये सुमेध सोनुले यांनी ९८ हजार, तर अतुल काळे यांचेकडून ८० हजार रुपये घेतले. सदर रक्कम ही कंपनीच्या नावावर असलेल्या खात्यात जमा न करता लोखंडे नामक महिला सदर शाखेच्या नागपूर कार्यालयात वरिष्ठ लिपिक आहे, असे सांगून ८७२३१०११०००३३०२ या खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. यावरुन दोन्ही युवकांनी पैसे पाठविले. यांनतर कराळे, मोहिते आणि लोखंडे नामक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद येत आहे. युवकांची फसवणूक केल्याचे उघड झाले.