अमरावतीत अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:30 IST2017-11-29T11:28:31+5:302017-11-29T11:30:40+5:30

जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतकऱ्यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाही, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Cheating Crimes Against Two Bt Seed Companies In Amravati | अमरावतीत अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

अमरावतीत अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ठळक मुद्देआसेगाव ठाण्यात तक्रार पोलिसांचा पंचनामा, उर्वरित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतकऱ्यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाही, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बीटी बियाणे कंपन्यांनी नमूद केलेल्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री केलेली नाही. त्यामुळे कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला व शेतकऱ्यांचे प्रति एकर सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे भातकुली तालुका कृषी विभागाच्यावतीने सोमवारी सायंकाळी आसेगाव ठाण्यात बियाणे कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार दाखल करण्यात आली. या आधारे कावेरी व अजित सिड्स या दोन कंपन्यांविरुद्ध भादंवी ४२० व कलम १३ महाराष्ट्र सिड्स अ‍ॅक्ट २००९ अन्वये गुन्हा नोंदविला. मंगळवारी दुपारी आसेगाव पोलिसांनी पूर्णानगर तेथील सात शेतकऱ्यांच्या बाधित पिकाचा पंचनामा केला


विदर्भातील दुसरी तक्रार
जिल्हा समितीच्या अहवालात ९६ टक्के बोंडे किडली असल्याने किमान एक लाख २५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. याविषयीची पहिली तक्रार अकोला येथे, तर दुसरी तक्रार आसेगाव ठाण्यात दाखल झाली. विभागात आठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित असल्याने त्या शेतकऱ्यांना न्याय व नुकसान भरपाई केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
बुधवारी पुण्याला कृषी आयुक्तांनी बैठक बोलाविलीे. यामध्ये विभागातील बीटी कपाशीच्या नुकसानीची स्थिती सादर करणार आहोत. या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासाजनक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
- सुभाष नागरे,
कृषी सहसंचालक

Web Title: Cheating Crimes Against Two Bt Seed Companies In Amravati

टॅग्स :agricultureशेती