शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

बेरोजगारांना गंडविणारी टोळी जेरबंद, 10 लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:07 PM

नोकरीचे आमिष : दहा लाख ४० हजाराने केली फसवणूक

यवतमाळ : सर्वसाधारण कुटुंबातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष देऊन आर्थिक फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीने आतापर्यंत २२ लाखांवर रक्कम उकळल्याचे सांगण्यात येते. अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. 

वैभव देशमुख, अंकुश कावलकर दोघे रा. अमरावती, रमेश गिरी रा. मादनी ता. आर्वी जि. वर्धा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी उत्तम रामचरण इंगोले रा. दिग्रस यांचा मुलगा कुशल याला भारतीय स्टेट बँक मानकापूर नागपूर येथे नियुक्ती झाल्याच्या आदेशाची प्रत दिली. कुशल इंगोले तो नियुक्ती आदेश घेऊन बँकेत गेला असता अशी कुठल्याही प्रकारची नियुक्ती बँकेकडून झाली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच तो नियुक्ती आदेश खोटा असल्याचेही स्टेट बँकेच्या मानकापूर शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उत्तम इंगोले यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली. या आरोपींनी नरेश पंढरीनाथ निमजे रा. समतानगर वडगाव यांचा मुलगा विशाल, कांता दयाराम पाढेण रा. सह्यांद्री सोसायटी यांची मुलगी प्रांजली या दोघांना वन विभागात कायमस्वरूपी नोकरीचे आमिष देऊन पैसे उकळल्याचे चौकशीत पुढे आले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात उत्तम इंगोले यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ५०४, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत व त्यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या आरोपींकडून विदर्भातील इतरही शहरातील बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अशी केली जाते फसवणूक साधारणत: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या घरातील बेरोजगारांना हेरून त्यांच्याशी संबंध निर्माण केले जाते. विश्वास संपादन केल्यानंतर अगदी कौटुंबिक सदस्य असल्याचे भासवून हे भामटे नोकरीचे आमिष दाखवितात व पैसे उकळतात. अनेकांना खोटे नियुक्ती आदेश देऊन गंडविले आहे. अमरावती जिल्ह्यात या टोळीवर असे गुन्हे दाखल आहेत. इतर कुणाची फसवणूक झाल्याचे आढळल्यास त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Policeपोलिसamravati-pcअमरावतीamravati-acअमरावती