मुलाच्या अपहरण प्रकरणात ११ आरोपींविरुद्ध न्यायालयात चार्जसिट दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST2021-05-16T04:12:31+5:302021-05-16T04:12:31+5:30
अमरावती : बहुचर्चित चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात राजापेठ पोलिसांनी ९० दिवसांच्या आत आरोपींना अटक करून तपास पूर्ण केला. ...

मुलाच्या अपहरण प्रकरणात ११ आरोपींविरुद्ध न्यायालयात चार्जसिट दाखल
अमरावती : बहुचर्चित चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात राजापेठ पोलिसांनी ९० दिवसांच्या आत आरोपींना अटक करून तपास पूर्ण केला. त्यासंदर्भाची चार्जसिट ८ मे शनिवारी न्यायालयात सादर केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक केली. सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. मुलाच्या अपहरणानंतर अमरावती हादरली होती. मात्र, अमरावती पोलिसांनी अहमदनगर गुन्हे शाखेच्या मदतीने मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूप अमरावतीला आणून आई-वडिलांचा स्वाधीन केले होते. या गुन्ह्यातील मास्टर माईंड आजीच निघाली. तिने तिची नातेवाईक असलेली हिना शेख व टकलूच्या व इतर आरोपीच्या मदतीने पाच कोटींसाठी अपहरणाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते. पोलीस पथकाने या गुन्ह्यात अहमदनगर व इतर ठिकाणावरून आठ आरोपींना अटक केली होती. एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांचा सुगावा लागताचा टकलू व अज्जू हा सायन मुंबईमार्गे गुजरातला पळून गेला होता. त्याला गुजरात पोलिसांनी एका बिल्डरच्या अपहरण प्रकरणातील टोळीत अटक केली. त्यालाही राजापेठ पोलिसांनी अमरावतीत आणले. मात्र, टकलू कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याचेवर उपचार करून कारागृहात रवानगी केली. राजापेठ पोलिसांनी आरोपींचा पीसीआर घेऊन आवश्यक तपास पूर्ण केला. तसेच या प्रकरणात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून चार्जसिट न्यायालयात दाखल केली. आता या प्रकरणात काय निकाल लागतो व आरोपींना किती शिक्षा होते, याकडे अमरावतीकरांची लक्ष लागले आहे.
कोट
या प्रकरणात १० आरोपींना अटक, तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते. तपास पूर्ण करून ११ आरोपींविरुद्ध न्यायालयात ८ मे रोजी चार्जसिट दाखल केली आहे.
- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे