घटांगनजीक अपघात, सहा जखमी

By Admin | Updated: May 19, 2016 00:12 IST2016-05-19T00:12:30+5:302016-05-19T00:12:30+5:30

धामनगाव रेल्वे येथून आजारी आईला इंदूर येथे परिवारासह खाजगी कुझर गाडीने नेतांना बुधवारी पहाटे ४ वाजता टिप्पर ने जोरदार धडक दिली.

Charged accident, six wounded | घटांगनजीक अपघात, सहा जखमी

घटांगनजीक अपघात, सहा जखमी

एक गंभीर : धामणगाव रेल्वे येथील सूर्यवंशी कुटुंब जखमी
परतवाडा : धामनगाव रेल्वे येथून आजारी आईला इंदूर येथे परिवारासह खाजगी कुझर गाडीने नेतांना बुधवारी पहाटे ४ वाजता टिप्पर ने जोरदार धडक दिली. यात धामनगाव रेल्वे येथील सूर्यवंशी कुटुंबातील चार, चालक व त्याचा मित्र जखमी झाले. त्यांचेवर परतवाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुरेश सूर्यवंशी (६०), मंगला सूर्यवंशी (५५), शांता सूर्यवंशी (८०), लीलाबाई सूर्यवंशी (४५) सर्व रा.धामणगाव रेल्वे, चालक शे.सादिक ऊर्फ जावेद जाकीर (२६) रा.देवगाव त्याचा मित्र शे.करिम जफर रा.हिरापुरा अशी जखमींची नावे आहे. चालक गंभीर जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शांताबाई सूर्यवंशी या वृध्दा सतत आजारी असल्याने धामनगाव रेल्वे येथे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कुणीच नाही. सूर्यवंशी कुटुंब इंदूर स्थाईक झाले. परिणामी त्यांना सोबत नेण्यासाठी धामणगाव येथून गजानन बनकर यांच मालकीची एम.एच.२७ ए.सी.८१२१ कुझर गाडी सूर्यवंशी यांनी भाड्याने केली होती. परतवाडा, धारणी मागे इंदूरसाठी जात असताना चिखलदरा तालुक्यातील घटांग ते बिहाली दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या टिप्पर येणाऱ्या टिप्पर एच.एच.२७ एक्स ४३८० ने धडक दिली. यात कुझरमधील सर्व सहा जण जखमी झाले. घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना देण्यात आली. मिळेल त्या वाहनाने जखमींना येथील खाजगी दवाखान्यात पोलिसांनी भरती केले.

तीन तास वाहतूक ठप्प
परतवाडा इंदूर हा आंतराज्यीय महामार्ग असल्याने रात्री प्रत्येकी दोन तासांनंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे जंगल असल्याने सोडण्यात येते. त्यामुळे बुधवारी पहाटे ४ वाजता अपघात झाल्यानंतर जवळपास तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.

सोबत जाणे पडले महाग
देवगाव येथील क्रुझरचा चालक सादिक परतीच्या प्रवासात एकटा राहणार असल्याने त्याने अचलपूर येथील मित्र शे.फरियान सोबत घेतले होते. मदतीला गेलेल्या मित्र अपघातात जखमी झाला.

Web Title: Charged accident, six wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.