कामगारांची चारित्र्य पडताळणी कोरोना काळात माघारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:13+5:302021-01-08T04:37:13+5:30

अर्ज इंदल चव्हाण अमरावती : औद्योगिक क्षेत्रात काम करताना अनेक जबाबदारीसह जीवघेणा प्रसंगांचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे कामगारांचे ...

The character verification of the workers dates back to the Corona period | कामगारांची चारित्र्य पडताळणी कोरोना काळात माघारली

कामगारांची चारित्र्य पडताळणी कोरोना काळात माघारली

अर्ज इंदल चव्हाण

अमरावती : औद्योगिक क्षेत्रात काम करताना अनेक जबाबदारीसह जीवघेणा प्रसंगांचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे कामगारांचे चारित्र्य पडताळणी अनिवार्य असते. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना काळात या प्रक्रियेला कोरोना काळात बाधा पोहोचल्याचे दिसून आले. एप्रिल ते मे मध्ये केवळ ७ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे.

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत नांदगाव पेठ, अमरावती या दोन एमआयडीसीसह शहरातील विविध विभागांतील कामगारांची चारित्र्य पडताळणी केली जाते, तर तालुका पातळीवरील खासगी, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत केली जाते. त्यानुसार जिल्हा ग्रामीणअंतर्गत जानेवारी महिन्यात ३४८, फेब्रुवारीत ५०७, मार्चमध्ये६४३, एप्रिल आणि मे निरंक, जून ३१२, जुलैमध्ये २४८, ऑगस्टमध्ये ३४९, सप्टेंबरमध्ये ७४३, नोव्हेंबरमध्ये ६३९, डिसेंबरमध्ये ७७१, असे एकूण ४९९८ व्यक्तींनी चारित्र पडताळणीकरिता अर्ज केल्याची नोंद झालेली आहे.

बॉक्स

अशी झाली कामगारांची चारित्र्य पडताळणी

जानेवारी ३४२

फेब्रुवारी ४२०

मार्च २९६

एप्रिल १

मे ६

जून ४००

जुलै २२८

ऑगस्ट १८४

सप्टेंबर ४०७

ऑक्टोबर २५५

नोव्हेंबर ४५०

डिसेंबर २९०

एकूण ३२८०

दोन वर्षांत ६८३८ कामगारांची तपासणी

शहर आयुक्तालय हद्दीतील कामगारांची चारित्र्य पडताळणी यंदा एप्रिल आणि मे मध्ये कडक लॉकडाऊनमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सन २०१८ मध्ये २८६६ कामगारांची चारित्र्य पडताळणी झाली. सन २०१९ मध्ये ३९७२ कामारांची, तर सन २०२० मध्ये ३२८० कामगारांची चारित्र्य पडताळणी करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस आयुक्तालयातून मिळाली.

पडताळणीसाठी असा करा अर्ज

कामगारांनी पीसीएस (पोलीस क्लिअरन्स सर्व्हिस) या साईडवर ऑनलाईन अर्ज करावा. सोबत आयडी प्रुफ, स्वत:चे पासपोर्ट साईड छायाचित्र, आधार, पॅन, वाहन चालविण्याचा परवाना, घरचा पत्ता, आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तेथील ऑर्डर किंवा अधिकाऱ्यांचे पत्र अर्जासोबत १०० रुपयांच्या शुल्कासह सादर करावी लागतात. त्यानंतर पूर्ण प्रक्रियेअंती पोलीस विभागाद्वारा कामगारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जातात. असे अनेकांचे प्रमाणपत्र तयार झालेले असून, ज्यांनी अर्ज केलेले आहेत, त्यांनी अर्ज घेऊन जाण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

बॉक्स

आरोग्य विभागात तातडीने पडताळणी

कोरोना काळात ही प्रक्रिया मंदावली होती. कोरोना चाचणी दरम्यान एका लॅबमधील कर्मचाऱ्याने युवतीच्या योनीतून स्त्राव घेतल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यामुळे आरोग्य विभागातील प्रत्यक कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करवून घेण्यात आली. ज्यांनी अर्ज दिलेले नाहीत, अशा उद्योजकांकडील कामगारांच्या चारित्र्य पडताळणीकरिता संबंधी उद्योजकांना पत्र देण्यात येईल. आरोग्य विभागातील कामगारांची तातडीने चारित्र्य पडताळणी करवून घेण्यात आली, अशी माहिती शहर पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली.

कोट

उद्योग क्षेत्रातील अत्यंत महागड्या मशिनरीज कामगारांच्या अखत्यारित असतात. त्यामुळे त्यांची चारित्र्य पडताळणी होणे गरजेचे आहे. प्रत्येक कामगारांनी त्यासाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज केलाच पाहिजे. मातझ्याकडे सहा कामगार आहेत. त्यांना चारित्र्य पडताळणीकरिता मी प्रत्साहित केले.

- विजय भगत, ए.व्ही. इंजिनीअरिंग एमआयडीसी, अमरावती

--

कामगारांचे चारित्र्य पडताळणीचे काय एप्रिल व मे महिन्यात कडक लॉकडाऊनमुळे थांबले होते. मात्र, आता सातत्याने अर्ज प्राप्त होत आहे. जिल्ह्यात ग्रामीण आणि शहर मिळून ८२७८ कामगारांसह कर्मचाऱ्यांनी चारित्र्य पडताळणीसंदभार्त अर्ज केले आहे.

- हरिबालाजी एन.

जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: The character verification of the workers dates back to the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.