शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

वनकायद्यातील बदलांनी आदिवासींना उघड्यावर आणण्याचा डाव - वृंदा करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 18:36 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर टीका 

श्यामकांत पाण्डेय

धारणी (अमरावती) : केंद्रातील मोदी सरकार विविध प्रकल्पांच्या नावाखाली गोरगरीब आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्यासाठी वन कायदा १९८१ मधील ग्रामसभेची तरतूद संपवून वनाधिकार कायदा २००६ सुधारित करून आदिवासींना हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवत आहे. गोरगरिबांना आपल्या उपजीविकेसाठी एकमेव आधार असलेली शेतजमीन वन व जल सिंचनाच्या नावाखाली प्रकल्प राबवून बळकविण्याचा व त्यांना वाऱ्यावर आणण्याचा डाव कोणत्याही प्रकारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सहन करणार नाही, असे सीपीआयच्या पॉलिट ब्यूरो सदस्य कॉम्रेड वृंदा करात (Brinda Karat) म्हणाल्या. धारणी येथे जाहीर सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मोदी सरकार पैशांचा बळावर निवडून आलेले सरकार पाडण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रावर त्याचा परिणाम झाला आहे. सरकारने सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा चंग बाधला आहे. पूर्वीच्या वन कायद्यामध्ये कोणताही प्रकल्प राबवण्यापूर्वी ग्रामसभेची मान्यता आवश्यक होती. परंतु, या सरकारने वनाधिकार कायदा २००६ सुधारित करून त्यामधून ग्रामसभा शब्द हटवून बळजबरीने आदिवासींच्या जमिनी खाली करून घेऊन त्यांना नाममात्र मोबदला देऊन वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार केला आहे, असे वृंदा करात म्हणाल्या. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा जर येथील जनता विरोध करीत असेल, तर आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाईफ फंक्शन हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेला काॅ. उदयन शर्मा, रणजित घोडेस्वार, भारत वरठे यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती.मेळघाटात वाचा हनुमान चालिसा

अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांनी मोठ्या शहरांमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचण्याऐवजी मेळघाटात येऊन आदिवासी चालिसा वाचावी, असा टोला वृंदा करात यांनी लगावला. एकंदर मेळघाटातील समस्यांबाबत आमचा पक्ष गंभीर असून आदिवासींना वनजमिनीचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्या म्हणाल्या.  

पक्षाची बांधणी करणार 

कॉम्रेड सुदामकाका देशमुख मेळघाटातील जबरदस्त पाठिंब्याच्या बळावर जिल्ह्यातील एकमेव कम्युनिस्ट खासदार झाले होते. त्यानंतर पक्ष मेळघाटातून हद्दपार झाला आहे. आता आम्ही नव्याने पक्ष बांधणी करीत असून त्यासाठी कार्यकर्ता मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता, असे वृंदा करात म्हणाल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना