संस्थेचे नाव बदलून आरक्षित जागेची विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:13 IST2018-10-03T22:13:05+5:302018-10-03T22:13:48+5:30
गृहनिर्माण संस्थेचे नाव बदलून आरक्षित जागेची विक्री करण्यात आल्याच्या तक्रारीवरून पोलीस चौकशीनंतर भ्रष्टाचाराचा भंडाफोड झाला आहे. बेनोडा येथील सर्व्हे क्रमांक १३ मधील आरक्षित जागा संस्थेच्या अध्यक्षाने परस्पर विकल्याचे उघड झाले असून, यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी नेमून शासनाकडून तक्रार देण्यात यावी, असा अहवाल फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे पाठविला आहे.

संस्थेचे नाव बदलून आरक्षित जागेची विक्री!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गृहनिर्माण संस्थेचे नाव बदलून आरक्षित जागेची विक्री करण्यात आल्याच्या तक्रारीवरून पोलीस चौकशीनंतर भ्रष्टाचाराचा भंडाफोड झाला आहे. बेनोडा येथील सर्व्हे क्रमांक १३ मधील आरक्षित जागा संस्थेच्या अध्यक्षाने परस्पर विकल्याचे उघड झाले असून, यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी नेमून शासनाकडून तक्रार देण्यात यावी, असा अहवाल फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे पाठविला आहे.
महादेव खोरी येथील रहिवासी सिद्धार्थ बनसोड यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. त्यामध्ये सहकारी संस्थेच्या जागा विकून अध्यक्ष रवींद्र दांडगे यांनी घोळ केल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगाने फ्रेजरपुरा पोलिसांनी तक्रारकर्ता बनसोड व गैरअर्जदार रवींद्र दांडगे यांचे बयाण नोंदविले. या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तावेज मागविले. सहजिल्हा निबंधकांचा अहवाल मागविला. पोलीस चौकशीनंतर घोळ उघड झाला आहे.
शासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ४ नोव्हेंबर १९८० रोजी महादेव खोरी येथील अनुसूचित जाती/जमाती सहकारी संस्थेला २ हेक्टर ४३ आर इतकी जागा प्रदान करण्यात आली. त्यावेळी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र दांडगे होते. संस्थेने बेनोडा येथील सर्व्हे क्रमांक १३ वर भूखंड पाडले. ७८ सभासदांनी घरे बांधले. काही जागा बगीचा, सभागृह व अन्य काही बाबींसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र दांडगे यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांकडून बाजारपेठ आरक्षणाचे आदेश रद्द करून कमलसुख गृहनिर्माण संस्था नामक वेगळ्या संस्थेची निर्मिती केली. त्यामुळे आरक्षित जागेसाठी जे लाभार्थी होते, त्यांना जागा मिळाली नाही. मात्र, स्वत: अध्यक्ष असल्याचा फायदा घेत दांडगे यांनी त्या आरक्षित जागेतील भूखंडाची विक्री केली, असे पोलिसांनी सांगितले.
कमलसुख सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने ही जागा खपविली, अशी तक्रार सिद्धार्थ बन्सोड यांनी समाजकल्याण विभाग व जिल्हा उपनिबंधकांकडे केली. त्यांच्या चौकशीतही शासनीची ही जागा शेड्युल्ड कास्ट सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिल्याची बाब पुढे आली. यासंबंधाने उपनिबंधकांनी कमलसुख सहकारी गृहनिर्माण संस्थाची मान्यता रद्दही केली. या प्रकरणात फे्रजरपुºयाचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी चौकशी केली.
गैरअर्जदार रवींद्र दांडगे यांनी शासकीय जागेची परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे. हा चौकशी अहवाल ठाणेदारांच्या स्वाक्षरीने बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना मत मागविले आहे.
पोलीस चौकशीत भ्रष्टाचार उघड झाल्याचा अहवाल असेल, तर प्रकरणात कारवाई नक्की होईल. अहवालाच्या निरीक्षणानंतर पोलिसांना कारवाईसाठी कळवू.
- अभिजित बांगर
जिल्हाधिकारी
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. तो अहवाल जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा ठाणे.
सहकारी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र दांडगे यांनी बनावट दस्तावेज तयार करून प्लॉटविक्री केल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलीस चौकशी सुरू आहे.
- सिद्धार्थ बनसोड
तक्रारकर्ता.
सहकारी संस्थेच्या जमिनीची संस्थाध्यक्ष रवींद्र दांडगे यांनी परस्पर विक्री केली. याबाबत तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आमचा लढा यशस्वी होईलच.
- उमेश हिवराळे
प्रदेश सचिव, बसपा