बीडीओंच्या बदलीचा ठराव

By Admin | Updated: July 13, 2014 23:42 IST2014-07-13T23:42:22+5:302014-07-13T23:42:22+5:30

पंचायत समिती सदस्यांनीच गटविकास अधिकारी यांच्या बदलीचा ठराव घेतला आहे.

Change of BDs | बीडीओंच्या बदलीचा ठराव

बीडीओंच्या बदलीचा ठराव

खामगाव : येथील पंचायत समिती विविध कारणांमुळे गाजत असून येथील गटविकास विकास अधिकारी पी.आर.वाघ यांच्या कारकीर्दीमुळे पंचायत समिती सदस्यांनीच गटविकास अधिकारी यांच्या बदलीचा ठराव घेतला आहे. त्यामुळे येथील पंचायत समिती पुन्हा चर्चेत आली आहे.
प्रशासकीय कामकाज करताना अधिकार्‍यांना अधिनस्त कर्मचारी तसेच लोकसेवेसाठी निवडून आलेले जनप्रतिनिधींना विश्‍वासात घेवून कामकाज करावे लागते. कर्मचार्‍यांनीही अधिकार्‍यांना सहकार्य करणे अपेक्षित असते. तरच कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार सुरळीत होवू शकतो. मात्र येथे सुरुवातीपासूनच समन्वयाचा अभाव दिसून येतो. याआधीही कदाचित तेलगोटे नामक प्रामाणिक गटविकास अधिकारी असताना त्यांची बदली व्हावी व प्रभार मिळावा, यासाठी कामबंद, असहकार यासारखी आंदोलने झाली. तर त्यानंतर येथे प्रभारी गटविकास अधिकारी राहिला. तर आता गटविकास अधिकारी म्हणून पी.आर.वाघ हे आहेत. गत काही दिवसांअगोदर याच भावनेतून त्यांच्या टेबलमध्ये गांज्याची पुडी ठेवण्यात आल्याचे व पोलिसांना कळविण्यात आल्याचा प्रकार अजूनही चर्चेत आहे. तसेच कर्मचारी महिलेसोबत अनैतिक संबंधाचे आरोप झाल्याचे ऐकण्यात येते. त्यामुळे असे जीवनातून उठविण्याचे प्रकार अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये सुरु आहेत. पी.आर.वाघ येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांचे पगारातून कपात होणारे एलआयसीचे हप्त्याची पगारातून कपात करणे बंद करुन एलआयसी अंगावर घेतली. तसेच कर्मचार्‍यांच्या बँक कर्ज ओ.डी.प्रकरणातही ह्यअर्थपूर्णह्ण व्यवहार होत आहेत. आयकर रिटर्नचे फॉर्म अमुकाकडूनच भरणे व त्यासाठी एकत्रित निधी गोळा करणे, यासाठी काही कर्मचारी सुध्दा फिल्डींगला ठेवले आहेत. यामुळेच कर्मचारी त्रस्त झाल्याचे खाजगीत बोलताना सांगतात. तर हाच अनुभव पंचायत समितीचे सदस्यांना सुध्दा आला. त्यामुळे गत पंधरवड्यात झालेल्या पं.स.च्या सभेत सदस्यांनी गटविकास अधिकारी पी.आर.वाघ यांच्या बदलीचा ठराव घेतला आहे. बँकेची कामे वेळेवर न करणे, पदाधिकारी यांना विश्‍वासात न घेणे, न सांगता बैलजोडी वाटप करणे ही व इतर कारणे ठरावासाठी कारणीभूत ठरली आहेत. या ठरावाचे सूचक पं.स.सदस्य चैतन्य पाटील तर अनुमोदक सज्जाद उल्लाखान हे होते. तसेच या ठरावावर सभापती सतीष चव्हाण यांच्यासह इतर सत्ताधारी पंचायत समिती सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या ठरावामुळे पंचायत समिती पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे.

Web Title: Change of BDs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.