चांदूररेल्वेचे दोन नगरसेवक निष्कासित
By Admin | Updated: November 22, 2015 00:16 IST2015-11-22T00:16:24+5:302015-11-22T00:16:24+5:30
नगरपरिषदेतील भाजपचे दोन नगरसेवक काँग्रेसच्या गोटात सामील झाल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी त्यांना निष्कासित करण्याची मागणी ...

चांदूररेल्वेचे दोन नगरसेवक निष्कासित
चांदूररेल्वे : नगरपरिषदेतील भाजपचे दोन नगरसेवक काँग्रेसच्या गोटात सामील झाल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी त्यांना निष्कासित करण्याची मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे केली होती. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी तडकाफडकी दोन नगरसेवकांना निष्कासित केले आहे.
निष्कासित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये बच्चू वानरे व संगीता सूर्यवंशी यांचा समावेश आहे. नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर स्थानिक नगर पालिकेत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. चांदूररेल्वे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी ३० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र २७ नोव्हेंबरपासून भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु निवडणुकीपूर्वीच दोन नगरसेवकांना निष्कासित करण्यात आल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी चर्चेला उधाण आले आहे.
(तालुका प्रतिनिधी)