चांदूररेल्वे, धामणगाव भाजपाचे सभापती उपसभापती विजयी

By Admin | Updated: December 15, 2014 22:48 IST2014-12-15T22:48:34+5:302014-12-15T22:48:34+5:30

चांदूररेल्वे व धामणगाव पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे. चांदूररेल्वे येथे किशोर झाडे सभापती तर

Chandurrelv, Dhamangaon BJP Vice-President, won the Vice President | चांदूररेल्वे, धामणगाव भाजपाचे सभापती उपसभापती विजयी

चांदूररेल्वे, धामणगाव भाजपाचे सभापती उपसभापती विजयी

तिवसा/चांदूररेल्वे/धामणगाव : चांदूररेल्वे व धामणगाव पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे. चांदूररेल्वे येथे किशोर झाडे सभापती तर देविका राठोड उपसभापती झाल्यात. धामणगाव पंचायत समितीमध्ये गणेश राजनकर सभापती तर अतुल देशमुख उपसभापतीपदी निवडून आले आहे. तिवसा पंचायत समितीमध्ये भाजपाच्या अर्चना विरूळकर सभापतीपदी अविरोध निवडून आल्यात. उपसभापतीपदासाठी ‘टाय’ फसल्याने सोडतीद्वारे प्रहारच्या गौरी संजय देशमुख विजयी झाल्या.
तिवसा : पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव होते. या प्रवर्गातील एकच महिला सदस्य असल्याने भाजपच्या अर्चना विरूळकर या अविरोध निवडून आल्यात. पंचायत समितीमध्ये काँग्रेस ३ व भाजपा १, प्रहार १ व शिवसेना १ अशी सदस्यसंख्या आहे. उपसभापतीपदासाठी काँग्रेसच्या उज्ज्वला पांडव व प्रहारच्या गौरी संजय देशमुख यांनी नामांकन दाखल केले. हात उंचविण्याच्या प्रक्रियेत ३ विरोधात ३ असा ‘टाय’ फसल्याने पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार विजय लोखंडे यांनी या दोघांच्या नावाने सोडत काढण्याचा निर्णय घेतला. सोनाली प्रकाश मानकर या ६ वर्षीय बालिकेने सोडत काढली यामध्ये गौरी संजय देशमुख यांच्या बाजूने चिठ्ठी निघाल्याने सोडतीद्वारे त्यांनी विजयी घोषित केले. तिवसा पंचायत समितीमध्ये भाजपा व प्रहारचा प्रत्येकी एक सदस्य असताना सोडतीद्वारे सभापती व उपसभापतीपद मिळाले आहे.
चांदूररेल्वे : पंचायत समिती सभापती व उपसभापतीची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकारी तहसीलदार इकबाल अहमद होते. प्रारंभी सभापतीपदासाठी भाजपाकडून किशोर झाडे त्यांचे विरोधात काँग्रेसचे सतीश देशमुख यांनी अर्ज दाखल केला होता. उपसभापतीपदासाठी भाजपाकडून देविका राठोड तर काँग्रेसतर्फे उपसभापती पदासाठी भीमराव करवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. झाडे यांना ४ तर देशमुख यांना २ उपसभापतीच्या राठोड यांना ४ तर करवाडे यांना २ मते मिळाली. यामध्ये सभापतीपदी किशोर झाडे व उपसभापतीपदी देविका राठोड निवडून आलेत. निवड होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजी, गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.
धामणगाव (रेल्वे) : पंचायत समिती सभागृहात दोन्ही पदासाठी निवडणूक झाली भाजपाच्यावतीने सभापती पदासाठी गणेश राजणकर तर काँग्रेसच्यावतीने प्रिती ढोबळे यांनी अर्ज दाखल केले़ यात राजणकर यांना पाच तसेच ढोबळे यांना तीन मते मिळाली ़
उपसभापती पदासाठी भाजपाचे अतुल देशमुख यांनी तर काँग्रेसच्यावतीने संगीता निमकर यांनी नामांकण दाखल केले, यात देशमुख यांना पाच व निमकर यांना तीन मते मिळाली निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार संजय गरकल व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संजय गुहे यांनी कामकाज पाहिले़ सभापती पद हे नागरिकांच्या मागास वर्गाकरीता राखीव होते़ दोन्ही पदावर भाजपाने कब्जा मिळवील्यानंतर भाजपाचे नेते अरूण अडसड यांच्या नेतृत्वात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी यात सचिन पाटील, वनिता राऊत, रोशन कंगाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़

Web Title: Chandurrelv, Dhamangaon BJP Vice-President, won the Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.