चांदूररेल्वे डाक कार्यालय झाले 'आॅनलाईन'
By Admin | Updated: May 13, 2015 00:18 IST2015-05-13T00:18:12+5:302015-05-13T00:18:12+5:30
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत बँकांपाठोपाठ आता पोस्टखातेही आॅनलाईन होत आहेत.

चांदूररेल्वे डाक कार्यालय झाले 'आॅनलाईन'
चांदूररेल्वे : प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत बँकांपाठोपाठ आता पोस्टखातेही आॅनलाईन होत आहेत. चांदूररेल्वेची पोस्टाची शाखा आता आॅनलाईन झाली असून यानंतर सर्व खातेधारकांना याचा लाभ होईल.
देशभरात इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्टीव्हिटी वाढत आहे. त्यात फार प्राचीन असलेली पोस्ट खात्याची सुविधा कशी मागे राहील याच अनुषंगाने चांदूररेल्वे येथील पोस्टाच्या शाखेच्या आॅनलाईन सुविधेचे उद्घाटन प्रवर अधीक्षक बेग यांच्या हस्ते उपअधीक्षक लाखोरकर, पोस्टमास्तर पी. एस. दहाट यांच्या उपस्थितीत पार पडले. यापुढे पोस्ट खाते कोअर बँकींगप्रमाणे कार्य करील यामध्ये बचत खाते, आरडी, एनएसएसके अकाऊंट व किसान विकास पत्र या सुविधांसाठी आता आपल्याला खाते ट्रान्सफर करण्याची गरज नसून देशातील कुठल्याही शाखेतून या सुविधांचा लाभ खातेधारकाला घेता येईल अशी माहिती प्रवर अधीक्षक बेग यांनी सीसीएनला दिली. या छोटेखानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. जी. उमाळे, फुसे, सी. एम. राऊत, पी. पी. सांदेकर, बी. आर. पवार, एस. पी. चर्जन, एस. बी. पवार, पोस्टमन एस. एम. काळबांडे, ए. एस. बोंडे, डब्ल्यू. आर. बाबर, अजय गावंडे, नरेंद्र वालोंद्रे यांनी अथक परिश्रम घेतले. पोस्ट खाते आॅनलाईन झाल्यामुळे खातेधारकांना याचा नक्कीच फायदा होणार हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)