चांदूरच्या पंचायत समिती कार्यालयाला लागली गळती
By Admin | Updated: August 7, 2015 00:28 IST2015-08-07T00:28:33+5:302015-08-07T00:28:33+5:30
दोन दिवसांच्या सतत पावसामुळे पंचायत समिती कार्यालयाला गळती लागली. असून यामुळे पंचायत समिती कार्यालयातील कामकाज पुर्णत: प्रभावित झाले आहे.

चांदूरच्या पंचायत समिती कार्यालयाला लागली गळती
चांदूरबाजार : दोन दिवसांच्या सतत पावसामुळे पंचायत समिती कार्यालयाला गळती लागली. असून यामुळे पंचायत समिती कार्यालयातील कामकाज पुर्णत: प्रभावित झाले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वात जास्त शासकीय कामे पंचायत समिती कार्यालयातच असतात त्यात घरकूल योजना, रोहयो शिक्षण विभाग, पाणीपुरवठा, आरोग्य, कृषी यासारखे महत्त्वाचे कामासाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये येत असतात. पण चांदूरबाजार पंचायत समितीची इमारत जुणी असून वर इंग्रजी कवेलूचे छत आहे. वानरामुळे हे कवेलू अनेक ठिकाणी फुटले असून त्यावर प्लास्टिक ताडपत्री टाकण्यात आली होती. पण हवेमुळे ही ताडपत्री उडून गेली व या दोन दिवसांचा पावसामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासहीत संपूर्ण पंचायत समिती कार्यालयात पाणी गळत होते.
कार्यालयातील फायली ओल्या होऊ नयेत म्हणून कर्मचारी काळजी घेत होते. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी असतानादेखील नाईलाजाने कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यामुळे ग्रामीण भागातून कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना आल्यापाऊली परत जावे लागत आहे. त्यात खंडविकास अधिकारी मागील अनेक दिवसापासून रजेवर गेले असल्याने कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. मात्र प्रभारी अधिकारीसुध्दा रजेवर गेले असल्याने पंचायत समिती कार्यालयाचा कारभार बोकाळला असून शुकशुकाट असल्याचे दिसून आले आहे.
पंचायत समिती कार्यालयाची नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे, असे असले तरीही जर पाऊस असाच सुरु राहिल्यास पंचायत समितीचे कामकाज आणखी किती दिवस बंद राहणार हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे यासंबंधिक नागरिकांच्या येरझारा सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)