चंद्रपूरच्या घटनेचे अचलपुरात तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST2021-08-24T04:17:48+5:302021-08-24T04:17:48+5:30

फोटो - एकता २३ पी फोटो कॅप्शन - अचलपूर येथे एसडीएम यांना निवेदन देताना रिपब्लिकन एकता मंच चे पदाधिकारी ...

Chandrapur incident has severe repercussions in Achalpur | चंद्रपूरच्या घटनेचे अचलपुरात तीव्र पडसाद

चंद्रपूरच्या घटनेचे अचलपुरात तीव्र पडसाद

फोटो - एकता २३ पी

फोटो कॅप्शन - अचलपूर येथे एसडीएम यांना निवेदन देताना रिपब्लिकन एकता मंच चे पदाधिकारी व कार्यकर्ते.

परतवाडा : चंद्रपूर जिल्ह्यात भानामतीच्या संशयावरून दलित महिला-वृद्धांना बांधून मारहाण करणाऱ्या दोषींवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन एकता मंचने अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना सोमवारी निवेदनातून दिला. घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

रिपब्लिकन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रताप अभ्यंकर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा शाखा व अचलपूर तालुक्याच्यावतीने सोमवारी निवेदन देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द या गावात शनिवारी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेला तीन दिवस उलटूनसुद्धा कारवाई करण्यात आली नाही. प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप रिपब्लिकन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रताप अभ्यंकर यांनी केला. निवेदन देताना त्यांच्यासह सचिन शेजव, राहुल गवई, प्रमोद तानोडकर, वैभव वानखडे, मनीष वानखडे, सागर वानखडे, हितेश वानखडे, नितीन शेजव, सत्यविजय इंगळे, भारत हिवराळे, सुनील सरदार, प्रफुल्ल सरदार, गजानन गवई, अमरदीप रायबोले, प्रमोद दाभाडे, गौतम सरदारसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते.

Web Title: Chandrapur incident has severe repercussions in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.