दर्यापुरात ‘चंद्रभागा आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:04+5:302021-09-21T04:14:04+5:30
नगरपालिका प्रशासनाचा उपक्रम, जलप्रदूषण थांबविण्यासाठी उचलले पाऊल फोटो - दर्यापूर २० पी दर्यापूर : दर्यापूर, बनोसा, बाभळी ...

दर्यापुरात ‘चंद्रभागा आपल्या दारी’
नगरपालिका प्रशासनाचा उपक्रम, जलप्रदूषण थांबविण्यासाठी उचलले पाऊल
फोटो - दर्यापूर २० पी
दर्यापूर : दर्यापूर, बनोसा, बाभळी या परिसरातील नागरिकांनी घरोघरी स्थापन केलेल्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन व निर्माल्य गोळा करण्यासाठी नगर परिषद, जल-वृक्ष चळवळ, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त पुढाकाराने ‘चंद्रभागा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
बाप्पांच्या निरोपाची जय्यत तयारी करून नगरपालिका प्रशासन व शहरवासीयांतर्फे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह सजावट उपलब्ध करून देत ट्रॉलीमध्ये जलकुंभ तयार करण्यात आला. दर्यापूर, बनोसा, बाभळी या भागांमध्ये हे ट्रॅक्टर घरोघरी गेले. शहरवासीयांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नदीमधील होणारे प्रदूषण थांबेल, कोणत्याही प्रकार अनर्थ टळेल, या उपक्रमाचा उद्देश होता. शहरातील सामाजिक कार्यकर्ते व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला. या उपक्रमातून गणेशमूर्ती एकत्र करून त्यांचे विघटन केले जाईल, मूर्तीची विटंबना होणार नाही, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी पराग वानखडे, पोलीस निरीक्षक प्रमेश अत्राम, विजय विल्हेकर, नगरसेवक उद्धवराव नळकांडे, प्रवीण कावरे विजय मेंढे, अनिल कुंडलवाल, मनोज तायडे, डॉ. दिनेश म्हाला, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, गाडगेबाबा महिला मंडळ जलवृक्ष चळवळीच्या कार्यकर्त्यांसह शकुंतला शिंदे, डॉ. श्वेता शिंदे, मालिनी रेखे, जयश्री चव्हाण, निकिता देशमुख, जाकीर इस्माईल, आरिफ शेख दिलावर, सुधाकर हातेकर, डॉ. राजपूत, प्रा. राजेंद्र पारडे, प्रणव कोठारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
200921\1334-img-20210920-wa0007.jpg
नगरपालिका प्रशासनातर्फे चंद्रभागा आपल्या दारी उपक्रम..