चंद्रभागा फुगली, दर्यापुरातील हजार एकर शेती पाण्यात

By Admin | Updated: July 2, 2016 23:56 IST2016-07-02T23:56:58+5:302016-07-02T23:56:58+5:30

दोन दिवसांत झालेल्या पावसाने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे.

Chandrabhaga, Phugali, 1000 acres of farmland in the river water | चंद्रभागा फुगली, दर्यापुरातील हजार एकर शेती पाण्यात

चंद्रभागा फुगली, दर्यापुरातील हजार एकर शेती पाण्यात

दर्यापूर : दोन दिवसांत झालेल्या पावसाने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. अचलपूर तालुक्यातील वघाळी नाल्याला आलेल्या पुराने नाल्यावरील बांध फुटल्याने व बोपापूर धरणाचे पाणी सोडल्याने चंद्रभागेतील पाण्यात अचानक भर आली. यामुळे दर्यापूर तालुक्यातील जवळपास हजारो एकर पेरणी झालेल्या नदीकाठच्या शेतजमीनीत पाणी शिरले आहे. दर्यापूर तालुक्यातील सांगवा, महिमापूर, घडा, चंद्रपूर, लांडी, शिरगव्हाण, चांदई, खेलनागवे, आराळा, माटरगाव, गौरखेडा, बेंबळा, दारापूर या १३ गावांतील नदीकाची शेतजमीन पाण्याखाली आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाची अधिकारी तहसीलदार राहूल तायडे, आपली मंडळ अधिकारी विकास पवार, राहूल चव्हाण आदींनी नुकसानग्रस्त भागात भेट दिली असून नुकसानीचा आढावा काढण्याचे आदेश कृषी सहायक व तलाठी यांना देण्यात आले आहेत.
चंद्रभागा नदीला आलेल्या या अचानक पाण्याने नदीकाठची जनता घाबरुन गेली असून प्रशासनातर्फे आपली व्यवस्थापनाची संपूर्ण तयारी करण्यात आल्याचे तहसीलदार राहूल तायडे यांनी सांगितले. सन २००७ मध्ये आलेल्या पुराने दर्यापूर तालुक्यात दाहाकाट उडविला होता. त्याची पुनरावृत्ती होते की काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे वाघोळी नाल्याचा बांध फुटून चंद्रभागेत पाणी वाढल्याचा तसेच धरणाचे पाणी सोडण्याचा कुठलाही संदेश प्रशसनातर्फे जारी करण्यात आला नव्हता. यामुळे निर्धास्त असलेल्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे. आज सकाळी चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे आधीच दुथडी भरून वाहनाऱ्या नदी नाल्यांचे बांध फुटल्याने पुराने रौद्ररुप धारण केले. शेत शिवारात पाणी शिरल्याने नुकतीच पेरलेली शेती पाण्याखाली आली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

चंद्रभागेला अचानक आलेल्या पुरामुळे १३ गावांतील जवळपास ४०० हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. याबाबत आम्ही चमूसह भेट दिली असून नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश कृषी सहायक व तलाठ्यांना देण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पाकडून आम्हाला सूचना न मिळाल्याने धावपळ झाली. शेतकऱ्यांचा नुकसानीचा आढावा तातडीने वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
- राहुल तायडे,
तहसीलदार, दर्यापूर

Web Title: Chandrabhaga, Phugali, 1000 acres of farmland in the river water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.