चांदूरच्या बाजार समितीचे सभापतिपद सहकार गटाकडे

By Admin | Updated: October 14, 2015 00:26 IST2015-10-14T00:26:47+5:302015-10-14T00:26:47+5:30

चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदावर सहकार गटाचे उमेदवार विजयी झाले.

Chandpur's market committee's chairmanship of cooperative group | चांदूरच्या बाजार समितीचे सभापतिपद सहकार गटाकडे

चांदूरच्या बाजार समितीचे सभापतिपद सहकार गटाकडे

प्रहारला हादरा : सभापतिपदी नंदकिशोर वासनकर, उपसभापती अरविंद लंगोटे
चांदूरबाजार : चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदावर सहकार गटाचे उमेदवार विजयी झाले. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सभापतिपदासाठी नंदकिशोर वासनकर तर उपसभापतिपदी अरविंद लंगोटे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत प्रहारनेही दोन्ही पदासाठी आपले उमेदवार मैदानात उतरविले होते. परंतु त्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे प्रहारच्या उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले.
बाजार समितीच्या कार्यालयात दोन्ही गटाकडून सभापती व उपसभापतिपदासाठी दुपारी १२.३० ते १ यादरम्यान अनुक्रमे सभापती पदासाठी नंदकिशोर वासनकर व विनोद जवंजाळ यांनी नामांकन अर्ज दाखल केला. उपसभापतिपदासाठी अरविंद लंगोटे व सुभाष मेश्राम यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दोन्ही गटाकडून अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडणुकीसाठी गुप्त मतदान घ्यावे लागले. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत सभापतीपदी वासनकर यांना १४ मते मिळाली तर प्रहारच्या विनोद जवंजाळ यांना ४ मते मिळाली. तसेच उपसभापतीपदी सहकार गटाचे अरविंद लंगाटे यांना १३ मते पडली. सुभाष मेश्राम यांना ५ मते मिळाली. निवडणुकीचे काम निर्णय अधिकारी किशोर बलिंगे यांनी पाहिले. (तालुका प्रतिनिधी)

प्रहारचे एक मत फुटल्याची चर्चा
सभापतिपदासाठी झालेल्या मतदानात सहकारचे १३ व प्रहारचे ५ सदस्य असताना निवडून आलेल्या नंदकुमार वासनकर यांना एकमत जास्त मिळाले. फुटलेले हे मत प्रहारचे असल्यामुळे निकाल घोषित होताच चर्चेला उधाण आले होते.

बाजार समिती अंतर्गत येणारे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणे हा एकमेव ध्यास माझा व माझ्या सर्व संचालकांचा असेल. बाजार समितीचा विकास व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे सदैव प्राधान्य राहणार आहे.
- नंंदकिशोर वासनकर,
सभापती, बाजारसमिती

Web Title: Chandpur's market committee's chairmanship of cooperative group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.