चांदूरबाजार आगाराची भंगार गाडी झाडावर आदळली
By Admin | Updated: September 4, 2014 23:26 IST2014-09-04T23:26:13+5:302014-09-04T23:26:13+5:30
स्थानिक आगाराची एम.एच.४० ९८९२ क्रमांकांची एसटी बस ही घाटलाडकी-चांदूर बाजार मार्गे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चांदूर बाजार येथे येत असता सुरळी फाट्यासमोर अचानक झाडावर आदळली.

चांदूरबाजार आगाराची भंगार गाडी झाडावर आदळली
चालक-वाहकासह ३० जखमी : १० गंभीर, शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक
चांदूरबाजार : स्थानिक आगाराची एम.एच.४० ९८९२ क्रमांकांची एसटी बस ही घाटलाडकी-चांदूर बाजार मार्गे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चांदूर बाजार येथे येत असता सुरळी फाट्यासमोर अचानक झाडावर आदळली. यात शालेय विद्यार्थ्यांसह ३० प्रवाशी जखमी झाले. त्यात १० प्रवाशांची प्रकृती गंभीर जखमी झाले. ही घटना १०.३० वाजता घडली. जखमींना अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात गाडीचे स्टेअरींग अचानक एकीकडे वळल्यामुळे व त्याच वेळी ब्रेक फेल झाल्यामुळे घडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
चांदूर बाजार आगाराची बस क्रमांक एम.एच. ४० ९८९२ ही बस सकाळी १० वाजता घाटलाडकी ला गेली. तेथून शाळेय विद्यार्थ्यांना घेऊन सुरळी मार्गे चांदूर बाजारला येण्यास निघाली होती. दरम्यान सुरळी फाट्या समोर सुमारे १ कि.मी. अंतरावर गाडीचे स्टेअरींग एकीकडे वळू लागल्याचे चालकाच्या लक्षात आहे. त्याने वाहनाचे ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी शेजारच्या शेताच्या धुऱ्यावर असलेल्या बाभळीच्या झाडावर आदळली.
ही धडक इतकी भयानक होती की गाडीचा समोरचया भाग कॅबीनसह झाडात घुसला. यात बसच्या आतील सर्व बैठका तुटल्या. तसेच ५० ते ५५ प्रवाशी अक्षरशा: एकमेकांवर आदळले तर काही बसमधील लोखंडी पत्र्याचा मार लागल्याने जखमी झाले. सुदैवाने यात गाडीच्या केबीनमध्ये प्रवाशी व विद्यार्थी बसलेले नव्हते. अन्यथा या अपघात केबीनमधील एकही प्रवाशी जिवंत नसता अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.
यासर्व जखमींना आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी व चांदूर बाजारच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे जखमींना रुग्णालयात आणण्यासाठी एसटी प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळाले नाही. याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ही घटना घडली तेव्हा चांदूर बाजारचे आगार व्यवस्थापक आगारात उपस्थित नव्हते. त्यांनीसुद्धा जखमींना भेटण्याची तसदी घेतली नाही. या घटनेने एसटीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.