चंदामामा गृह उद्योगाने फसवणूकही केली

By Admin | Updated: May 3, 2017 00:13 IST2017-05-03T00:13:33+5:302017-05-03T00:13:33+5:30

‘जैन’ चिवड्यामध्ये तळलेली पाल आढळून आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच शहरात खळबळ उडाली.

Chandamama has cheated the home industry | चंदामामा गृह उद्योगाने फसवणूकही केली

चंदामामा गृह उद्योगाने फसवणूकही केली

पोलिसात तक्रार : ‘जैन गृहउद्योग’च्या नावे विक्री
अमरावती : ‘जैन’ चिवड्यामध्ये तळलेली पाल आढळून आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच शहरात खळबळ उडाली. दरम्यान ‘जैन गृहउद्योग’चे संचालकांनी आपल्या ‘ब्रँड’चा तसेच लायसन्स नंबरचा गैरवापर करून चंदामामा गृहउद्योगाने चिवड्याचे नकली उत्पादन बाजारात आणल्याचा आरोप केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. याबाबत त्यांनी पोलिसांसह एफडीए व महापालिकेकडे तक्रार केली आहे.
छाया गजानन चुंबळे (रा.भट कॉलनी, श्रीधरनगर, अमरावती) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. छाया चुंबळे यांचे भटवाडी परिसरात ‘जैन गृहउद्योग’नामक प्रतिष्ठान आहे. मात्र, शहरातील अन्य एका ‘चंदामामा गृहउद्योगा’ने त्यांच्या ब्रँडनेमसह परवाना क्रमांकाचा गैरवापर करून ‘जैन’च्या चिवड्याची नक्कल केली.

ब्रँडचा दुरुपयोग
अमरावती : या उत्पादनाची सर्रास बाजारात विक्री सुरू आहे. यामुळे आपली नाहक बदनामी होत असल्याचे छाया चुंबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. जैन उत्पादनाची नक्कल करणाऱ्या चंदामामा गृह उद्योगाच्या संचालकावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. यासंदर्भात जैन गृहउद्योेगच्या संचालिका छाया चुंबळे यांनी पोलिसांसह एफडीएकडे तक्रार देखील नोंदविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chandamama has cheated the home industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.