शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पश्चिम विदर्भातील ‘केम’ प्रकल्पापुढे ४० दिवसांत ३२.४० कोटी खर्चाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 16:02 IST

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती : पश्चिम विदर्भातीलशेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे. मात्र, आतापर्यंत ‘केम’ला केंद्र व राज्य शासनासकडून हजारो कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून खरेच शेतकºयांना त्याचा लाभ मिळाला का, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

‘कृषिसमृद्धी’ समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाची मुहूर्तमेढ १३ ऑगस्ट २००९ रोजी करण्यात आली. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये शासनामार्फत आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) व सर रतन टाटा ट्रस्ट (एसआरटीटी) यांच्या वित्तीय सहयोगाने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचा कालावधी ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात येणार होता. मात्र, या प्रकल्पास ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यानंतर प्रकल्पात कोणत्याही कामकाजाच्या खर्चाची प्रतिपूर्ती आयएफएडीकडून करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. परंतु,‘केम’ प्रकल्पांतर्गत प्रकल्पाकडील उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता, प्रकल्प समाप्तीबाबत व प्रकल्पाचे मूल्यांकनासाठी अधिकारी, कर्मचा-यांच्या सेवा ३१ मार्च २०१९ च्या पुढे सुरू ठेवण्यास तसेच प्रकल्पाकडील सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वितरित निधीपैकी ३२.४० कोटी एवढी रक्कम ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हा निर्णय १६ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. यापूर्वी ‘केम’मध्ये मोठ्या प्रमाणात निधीचा ‘गेम’ झाल्याच्या पार्श्वभूमिवर चौकशी सुरू आहे. अशातच आता ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये शेतक-यांच्या विविध योजनांवर खर्च होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  कमी कालावधी असताना ई-निविदा, खरेदी प्रक्रिया तसेच शेतकरी लाभार्थी, महिला बचत गट, कृषी क्षेत्राशी निगडित योजना राबविणे ‘चॅलेंजिंग’ ठरणारे आहे.

हे आहेत प्रकल्पाचे मुख्य उद्देश   घटलेले कृषी उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात योगदान देणे, प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबांचा शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पन्नांच्या स्त्रोतांसह कृषी व कृषिकेतर उत्पन्नांचा साधनाद्वारे विकास करणे, उत्पादनातील व बाजारपेठीय जोखिमींमुळे दारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे.

अशी आहे प्रकल्पाची व्याप्तीएकूण जिल्हे - ६एकूण तालुके - ६४ एकूण समूह - (२० ते २५ गावे) ६४एकूण गावे- १६०६कुटुंब संख्या- २, ८६, ८०० 

टॅग्स :FarmerशेतकरीVidarbhaविदर्भ