शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

लॉटरीच्या नावाखाली 'चक्री' जुगार! कोट्यवधींच्या फसवणुकीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:22 IST

Amravati : पीआय संदीप चव्हान यांच्या नेतृत्वात एपीआयद्वय अमोल कडू व महेशकुमार इंगोले यांच्या पथकाने दोन्ही कारवाई केल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ५ ऑगस्ट रोजी रात्री राजकमल चौकातील सीतारामबाबा मार्केट येथील एका ऑनलाईन लॉटरी सेंटरवर धाड टाकली. तेथे ऑनलाईन चक्री हा जुगार खेळविला जात होता. तेथून १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. युनिट दोनने २० जून रोजी तेथील तीन लॉटरी सेंटरवर धाड घालत ३१ जणांना ताब्यात घेतले होते. त्यात धनराज रामरख्यानी या मालकाविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो ऑनलाईन लॉटरीआड 'चक्री' जुगार खेळवत असल्याचे मंगळवारच्या कारवाईने स्पष्ट झाले.

सीतारामबाबा मार्केट येथे काही ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये फन टार्गेट, गोल्डन चान्स या वेबसाईटवर चक्री या जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार तेथे धाड केली असता तेथील जय लॉटरी या सेंटरमध्ये संगणकाच्या स्क्रीनवर फन टार्गेट वेबसाईटवर चक्री हा ऑनलाईन गेम सुरू असल्याचे दिसून आले. तेथे दोघेजण खेळवताना तर सहा जण खेळताना दिसून आले. तेथून धनराज रामरख्यानी (वय ५५, मनीपूर लेआऊट, अमरावती), रूपेश आलेकर (५०, अमरावती), ज्ञानेश्वर बेलोरकर (५०, वनारसी), सुनील पंजवानी (५९, रा. दस्तूर नगर), सतीश सावले (६०, रा. अंबापेठ, अमरावती), दिनेश लालवाणी (४०, रा. कंवर नगर), प्रकाश पिंजाणी (५६, रा.नविवस्ती बडनेरा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून नगदी ३३ हजार ३६० रुपये व अन्य मुद्देमाल जप्त करून तो कोतवालीच्या ताब्यात देण्यात आला. 

बेनाम चौकातील पानटपरीवरही 'ट्रॅप'बडनेरा रोडवरील बेनाम चौक येथील एका कॉप्लेक्समधील पान सेंटर दुकानामध्ये ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या आड फन टार्गेटवरील चक्री या जुगारावरदेखील क्राईम युनिट दोनने धाड टाकली. तेथून राहुल मारोतराव बागळे (३४, रा. साईनगर) हा खेळविताना तर, तौफेल खान सलावत खान (रा. नमुनागल्ली) व महेश राजू खोडे (२७, रा. साईनगर) या दोघांना खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख २ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरूद्ध राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Amravatiअमरावती