वंचित बहुजन आघाडीतर्फे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:10+5:302021-07-10T04:10:10+5:30
वरूड : नगर परिषदेच्यावतीने शहरातील पाणीपुरवठा चार-पाच दिवसांनी केला जात असल्याने आठवड्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देऊन पाणीपुरवठा दोन ...

वंचित बहुजन आघाडीतर्फे चक्काजाम आंदोलन
वरूड : नगर परिषदेच्यावतीने शहरातील पाणीपुरवठा चार-पाच दिवसांनी केला जात असल्याने आठवड्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देऊन पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याची मागणी केली होती. सात दिवसाचा अल्टिमेटम देऊन चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने स्थानिक मुलताई चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूक खोळंबळी होती. पोलिसांनी सुशील बेले व अन्य आंदोलकांना अटक केली.
यावेळी मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अशोक गडलिंग, प्रदीप दुपारे, अरविंद गाडगे, अमर हरले, नीलेश अधव, विनोद सोनागोते, राहुल लांडगे, महेंद्र निस्वादे, नितेश डबरासे, योगेश बिसान्द्रे, रोशन गाठे, राकेश गाठे, अक्षय तागडे, तेजस नागले, अनिकेत रामटेके, अक्षय तागडे, तहीर खान, शेख समीर, कुणाल बेसरे, नदीम शेख, नदीमशहा, नदीम काझीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.