‘कॅट’मध्ये चमकला देवव्रत
By Admin | Updated: January 12, 2016 00:22 IST2016-01-12T00:22:23+5:302016-01-12T00:22:23+5:30
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये अमरावतीचा देवव्रत राजेंद्र गणेडिवाल राष्ट्रीय स्तरावर चमकला आहे.

‘कॅट’मध्ये चमकला देवव्रत
अमरावतीच्या विद्यार्थ्याची भरारी
अमरावती : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये अमरावतीचा देवव्रत राजेंद्र गणेडिवाल राष्ट्रीय स्तरावर चमकला आहे.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये आयआयएमला मोठे महत्व आहे. यासंदर्भात देवव्रतने लोकमतशी संवाद साधला, बीटेक केल्यानंतर आयआयएमकडे जाण्याचा आपला कल होता आणि त्या दृष्टीने दररोज दोन ते तीन तास अभ्यास केल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये आपण कॅटला सामोरे जावून त्यात यश मिळविल्याचे तो म्हणाला. देवव्रतचे वडील राजेंद्र गणेडिवाल वैद्यकीय क्षेत्रात असून त्यांची आई कृषि फार्म हाऊसची जबाबदारी सांभाळते. देवव्रतची बहिणी आस्था ही सुध्दा बारावीच्या परीक्षेमध्ये अंपग प्रवर्गातून प्रथम आली आहे.
आपल्या दोन्ही मुलांवर कधी दडपण आणले नाही. त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात करीअर करण्याची मुभा दिल्याचे देवव्रतचे वडील राजेंद्र यांनी सांगितले.