चैतन्य परतले, स्थिती पूर्वपदावर (कोट)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:00+5:302021-06-02T04:11:00+5:30
- पप्पू गगलानी सचिव, तखतमल व्यापारी संघ कोट दोन महिन्यांनंतर आता दुकाने उघडल्यानंतर व्यापारी वर्गाला बरे वाटत आहे. कर्मचारीही ...

चैतन्य परतले, स्थिती पूर्वपदावर (कोट)
- पप्पू गगलानी
सचिव, तखतमल व्यापारी संघ
कोट
दोन महिन्यांनंतर आता दुकाने उघडल्यानंतर व्यापारी वर्गाला बरे वाटत आहे. कर्मचारीही सुखावले आहेत. मात्र, यामध्ये आमचा लग्नसराईचा धंदा बुडाला. आम्ही किमान तीन वर्षे मागे गेलो. यात दुकानदार, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
- किशन कोटवानी
अध्यक्ष, सिटीलॅन्ड वेल्फेअर असो.
कोट
अवलोकन करता येणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वर्षभराचे टार्गेट पूर्ण करणारा लग्नसोहळा व ईद या दोन मोठ्या संधी गमाविल्या गेल्या आहेत. दोन वर्षापासून ही स्थिती ओढवलेली आहे.
- विजय भुतडा
अध्यक्ष, बिझीलॅन्ड व्यापारी संघ
कोट
रुग्णसंख्या कमी होत असल्याने संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. पण लॉकडाऊन नको असल्यास नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर निघू नये, गर्दी करू नये, त्रिसूत्रीचे पालन महत्त्वाचे आहे.
- प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका