अचलपूर पालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींची निवड
By Admin | Updated: January 13, 2016 00:17 IST2016-01-13T00:17:10+5:302016-01-13T00:17:10+5:30
अचलपूर पालिकेच्या विशेष ६ समिती सदस्यांची निवड सोमवारी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या अध्यक्षतेत झाली.

अचलपूर पालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींची निवड
अचलपूर : अचलपूर पालिकेच्या विशेष ६ समिती सदस्यांची निवड सोमवारी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या अध्यक्षतेत झाली. यात प्रहार गटातून भारती तट्टे, एकता नगरविकासमधून ल.ज.दीक्षित व प्रॉगे्रेसिव्ह फ्रंटच्या फहमिदा बानो नाबील या तीन सदस्यांची निवड झाली. या निवडणुकांमुळे प्रहारमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. बांधकाम समितीत एकताच्या दीक्षित, विलास काशीकर, विश्वास गवई, लक्ष्मी बहोले, अरुण वानखडे, प्रोगे्रसिव्ह फ्रंट गटातून कमरुन्नीसा मो. शब्बीर, फहमिदा बानो, इब्राहीम नबील, रुपेश ढेपे, अभय माथने यांची निवड झाली. शिक्षण समितीसाठी गवई, काशीकर, संजय धमेले, नंदा चांदणे, संजय भोंडे, मो. जहरुल हसन, अख्तर बानो, शे. युसूफ, किर्ती तायडे,नितीन डकरे, बाबुलाल पंधरे, नियोजन समिती संजय धमेले, बाळासाहेब वानखडे, गोपाल लुल्ला, दीपाली विधळे, महिला व बालकल्याण शोभा मुगल, गवई, विधळे, नंदा चांदणे, लता गौर, वानखडे, अख्तरा बानो, शरिफाबी मो. अन्वर, शिला महल्ले, ममता उपाध्याय, सारीका नशिबकर, पाणी पुरवठा सभापती दुर्गा सुंडेवाले, गोपाल लुल्ला, बघेले, जहरुल, ढेपे, बुंदेले या सदस्यांची निवड करण्यात आली. शनिवारी सभापतीपदासाठी निवड होणार आहे. (शहर प्रतिनिधी)